नागरिक संतापले : ‘गॅलेक्सी बार’मधील मद्यपींचा कॅम्पमध्ये धुमाकूळलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई न करता उलटपक्षी त्यांनाच मद्यपींवर दगडफेक करण्याचा सल्ला ठाणेदारांनी दिल्याने कॅम्प स्थित नागरिक संतप्त झालेत. कॅम्प परिसरातील हॉटेल गॅलेक्सी रेस्टॉरेंट अॅन्ड बार समोर शनिवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. मद्यपींच्या धिंगाण्यामुळे या उच्चभ्रू वस्तीतील नागरिक संत्रस्त झाले व त्यांनी याबाबत पोलीस यंत्रणेला जाब विचारला. दरम्यान युवा स्वाभिमानचे पदाधिकारी अभिजित देशमुख यांनी रात्रीच्या सुमारास बारवर दगडफेक केली. येथील रहिवासी बार विरोधात एकवटले आहेत. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या ५०० मीटर अंतरावरील बार आणि दारू दुकाने बंद झाल्यानंतर उर्वरीत दारू दुकानांवर मद्यपींची गर्दी वाढली आहे. त्याच मालिकेत हॉटेल गॅलक्सी रेस्टॉरेंट अॅन्ड बारमध्येही मद्यपींचा राबता वाढला आहे. हॉटेल संचालकाने रेस्टॉरेंट बंद करून बारमधून दारुची पार्सल सेवा सुरू केली आहे. बारमधून दारू घ्यायची आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या राधाकृष्ण अपार्टमेंटसमोरील पदपथावर ठिय्या देऊन मनसोक्त मद्यपान करण्याचा प्रताप मद्यपींनी सुरू केला आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास काही मद्यपी अपार्टमेंटसमोरील पदपथावर मद्यपान करीत होते. दरम्यान अपार्टमेंटमधील रहिवासी माजी नगरसेविका सुजाता झाडे यांचे पती अनिल झाडे यांनी त्या मद्यपींना हटकले. मात्र मुजोर मद्यपी त्यांच्या अंगावर धावून गेले. हा गोंधळ उडताच अपार्टमेंटमधील सर्वच रहिवासी बाहेर आले. पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरम्यान मद्यपींनी धूम ठोकली. मद्यपी गेल्यानंतर पोलिसांनी हजेरी लावली. यावेळी नागरिकांनी पोलिसांसमोर व्यथा कथन केली असता मद्यपींना ‘तुम्हीही दगड मारून हाकलून का लावले नाही’, असा अजब सल्ला गाडगेनगरचे ठाणेदार के. एम. पुंडकर यांनी दिल्याचा आरोप नागरिकांनी केला. मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी या बार विरोधात जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनालाही निवेदन दिले आहे. मात्र यंत्रणेकडून प्रतिसाद न मिळाल्याने येथील नागरिकांमध्ये असंतोष उफाळला आहे. वॉचमन पुरवितो दारू गॅलेक्सी हॉटेल अॅन्ड बार बाहेरून बंद असले तरी तेथील वॉचमन दारुची पार्सल सेवा पुरवित असल्याचे नागरिकांनी सांगितले. बारमधून दारुचे पार्सल घेणे व रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पदपथावर बसून पिणे असा प्रकार दररोज चालत असतो. या त्रासामुळे परिसरातील महिलांना बाहेर पडणेही दुरापास्त झाले आहे.पार्किंगची जागा हडपलीमाजी नगरसेवक सुजाता झाडे यांच्यानुसार हॉटेल गॅलेक्सीला स्वतंत्र पार्किंग नाही. मात्र महापालिका वा पोलीस यंत्रणा त्यांच्यावर मेहेरबान आहे. गॅलक्सी बारकडून वापरण्यात येणारी पार्किंगची जागा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मालकीची असल्याचेही येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
ठाणेदार म्हणाले, तुम्हीही का नाही मारले दगड ?
By admin | Published: May 28, 2017 12:10 AM