लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी ३ हजार ३४२ मतदान यंत्रे मतदान प्रक्रियेसाठी सज्ज केली आहेत. सध्या ही सर्व मतदारसंघाच्या शासकीय गोदामामध्ये सुरक्षित यंत्रे ठेवली आहेत.
जिल्ह्यातील २४ लाख ५४ हजार ८४८ मतदारांसाठी दोन हजार ६८२ मतदान केंद्रेही केली आहेत. विधानसभा आचारसंहिता केव्हाही लागली तरी प्रशासनाने मतदार यादी अंतिम करण्यासह निवडणुकीसाठीची आवश्यक तयारी जोरात सुरू केली आहे. राज्य सरकारचा कार्यकाळ येत्या २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. राज्यात १५ ऑक्टोबरपूर्वी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी चालविली आहे.
मतदान यंत्राची तपासणी आटोपली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदारयंत्रे आली असून विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर यंत्राची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये १ ते २६ ऑगस्ट दरम्यान मतदान यंत्रणाची प्रथमस्तरीय तपासणी करण्यात आली. २७ व २८ ऑगस्ट रोजी विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसमोर मतदान यंत्रणावर मतदान यंत्रावर प्रात्यक्षिक घेण्यात आले.
निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज विधानसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम केली आहे. मतदानाची केंद्रेही निश्चित आहेत. मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. मतदानाच्या दृष्टीने आवश्यक तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विधानसभानिहाय मतदान केंद्र धामनगावरेल्वे ३७८ बडनेरा ३४५ अमरावती ३२२ तिवसा ३१९ दर्यापूर ३४२ मेळघाट ३५६ अचलपूर ३०९ मोर्शी ३११ एकूण २६८२