शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
4
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
5
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
6
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
7
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
8
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
9
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
10
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
11
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
12
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
13
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
14
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
15
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
17
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
18
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
19
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
20
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ

मतदान करतानाचे फोटो व्हायरल करणे भोवणार, कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 30, 2024 00:19 IST

लोकशाही प्रणालीमध्ये मताच्या गोपनीयतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे व याविषयीचा कायदादेखील आहे. त्याचे नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई केल्या जाते.

अमरावती : लोकसभा निवडणुकीत २६ एप्रिलला झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान स्वत:चे मतदान कोणाला केले, याची फोटो व व्हिडीओ काही अतिउत्साही मतदारांनी काढले व समाजमाध्यमांवर व्हायरल केले, त्यामध्ये मतदानाच्या गोपनियेचा भंग झाल्याने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी सोमवारी पोलिस यंत्रणेला दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी व प्रहार पक्षाच्या उमेदवारांमध्ये अंतिम टप्प्यात काट्याची लढत झाली व मतदानाच्या प्रक्रियेत मतदान करताना मत कोणत्या उमेदवाराला दिले, याबाबत उमेदवाराचे नाव, चिन्ह व मतदान यंत्रावरील क्रम दाखविणारे फोटो काढण्यात येऊन ते फेसबुक व व्हॉटस ॲपवरून व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार २६ तारखेला जिल्ह्यात घडला आहे.

लोकशाही प्रणालीमध्ये मताच्या गोपनीयतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे व याविषयीचा कायदादेखील आहे. त्याचे नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई केल्या जाते. यासाठी पोलिसांची यंत्रणा काम करते. किंबहुना निवडणूक दरम्यान अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन होत असल्याच त्यावर लक्ष ठेऊन कारवाई करण्यासाठी एक कक्षदेखील असतो. या कक्षाचे प्रमुख अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे आहेत. त्यांना याविषयी विचारणा केली असता मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याची कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे त्यांनी सांगितले.

मतदान केंद्रात मोबाइल वापरास मनाईमतदान केंद्रांचे १०० मीटर आत मोबाइल वापरास मनाई असताना येथे मतदान केंद्राच्या आत मोबाइल नेण्यात आला व कुण्या उमेदवाराला मतदान करीत आहे. याबाबतचे फोटो व व्हिडीओ काढण्यात आला व समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे संबंधित मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी व पोलिस काय करत होते, हा प्रश्न या निमित्ताने चर्चेत आला आहे.

तीन महिन्यांची कैद किंवा दंडाची तरतूदमतदानाची गोपनीयता भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२८ अन्वये तीन महिन्यांची कैद किंवा दंड किंवा एकाचवेळी दोन्ही शिक्षा असे कायद्यात तरतूद असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजीराव शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली, याबाबत अद्याप तक्रार प्राप्त नसल्याचे ते म्हणाले.

मतदानाची गोपनीयता भंग झाल्याबाबत अद्याप तक्रार प्राप्त नाही, परंतु याबाबतचा तपास करुन असे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला दिले आहेत.सौरभ कटियार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानElectionनिवडणूक