शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
5
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
6
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
7
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
8
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
9
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
10
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
11
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
12
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
13
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
14
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
15
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
16
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
17
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
18
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
19
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
20
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान

इविन येथील डे-केअर युनिटमध्ये रोज आवश्यकता आहे २० बॉटल रक्ताची

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 10:54 IST

Amravati : प्रश्नच; रक्ताशिवाय सिकलसेल, थैलेसेमिया रुग्ण कसे जगणार ?

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डे-केअर युनिटमध्ये सिकलसेल, थैलेसेमियाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णांना दर महिन्यातून किंवा दोन महिन्यातून रक्त द्यावे लागते. या रक्तावरच या रुग्णांचे जीवन अवलंबून आहे. या युनिटमध्ये रोज सरासरी २० ते २२ रुग्ण हे रक्त घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान चळवळ ही लोकचळवळ होणे गरजेचे आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. 

आपल्या रक्तदानामुळे आपण एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवू शकतो. जिल्ह्यात रोज शेकडो रुग्णांना रक्ताची गरज भासते. परंतु त्या तुलनेत रक्त उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना रक्ताअभावी जीव गमावण्याची वेळ येते. जिल्ह्यात प्रामुख्याने रक्ताची गरज ही सिकलसेल, थैलेसेमिया, अपघातग्रस्त रुग्ण, सिझेरियन प्रसूती, हिमोग्लोबिन कमी असलेले रुग्ण, विविध गंभीर आजारावरील आवश्यक शस्त्रक्रिया करतेवेळी संबंधित रुग्णाला देखील रक्ताची गरज असते. जिल्ह्यात सिकलसेल रुग्णांची संख्या ही ६०० तर थैलेसेमियाचे देखील ४५० च्या जवळपास रुग्णांची संख्या आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डे केअर युनिटमध्ये जवळपास उपचारासाठी रोज ३० ते ३५ रुग्ण रुग्ण दाखल होत असून यातील २० रुग्णांना रक्त चढविणे गरजेचे असते. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविण्याकरिता अमरावतीकरांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

सिझेरियन प्रसूतीमध्येही पडते रक्ताची गरज जिल्हा स्त्री रुग्णालय येथे रोज २५ ते ३० महिलांची प्रसूती होते. यामध्ये काही महिलांची प्रसूती ही बाळा आणि आईच्या सुरक्षेच्या दृष्टीने सिझेरियन करावी लागते. यावेळी सिझेरियन दरम्यानही काही महिलांना रक्ताची गरज भासते. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढीतून या महिलांना रक्त उपलब्ध करण्यात येते.

बुधवारी असा उपलब्ध होता रक्तसाठा बुधवारी ई-रक्तकोषवर अद्ययावत करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार इर्विन रक्तपेढीत ८ बॅग, डॉ. सदानंदजी बुर्मा ट्रस्ट रक्तपेढी परतवाडा येथे ० बॅग, संत गाडगेबाबा रक्तपेढी ३ बॅग, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी ६ बॅग, श्री बालाजी रक्तपेढीत ० बॅग, राजेंद्र गोडे रक्तपेढी ०, धारणी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी येथे ८ बॅग, तर जय माता दी मेळघाट रक्त्तपेढी येथे ५ बॅग रक्तसाठा उपलब्ध होता.

टॅग्स :AmravatiअमरावतीHealthआरोग्यBlood Bankरक्तपेढी