शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
2
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
3
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
4
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
5
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
6
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह १५ सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
7
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
8
... अशाने महाराष्ट्र कंगाल होईल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा घणाघात
9
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
10
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर
11
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे
12
उद्धव ठाकरे की शरद पवार? महायुतीची द्वारे कोणाला खुली होणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
13
बुमराहनं गमावला 'नंबर वन'चा मुकूट; टेस्टमध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट ठरला 'हा' गोलंदाज
14
Diwali 2024: इकडे कन्फ्युजनमध्ये राहाल, तिकडे शेअर बाजार चालूच राहिल.., पैसा जाईल; ३१ ऑक्टोबरचं काय?
15
राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं
16
सोलापुरात सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; कोणत्या मतदारसंघात कोण लढणार?
17
माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका
18
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
19
मारुती सुझुकी स्वत:साठीच नाही तर दुसऱ्या कंपनीलाही इलेक्ट्रिक कार बनवून देणार; केव्हा करणार लाँच
20
Salman Khan : सलमान खानला ६ वर्षांत १२ पेक्षा जास्त वेळा जीवे मारण्याच्या धमक्या; कोणी केलेला फोन?

मुलगी परतली, अपहरणकर्त्याला संपविले कुणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2022 12:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्क चांदूर रेल्वे : शहरातील गारुडीपुऱ्यातून अपहरण केलेली अल्पवयीन मुलगी अपहरणकर्त्याने गुरुवारी रात्री परत आणून सोडली आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : शहरातील गारुडीपुऱ्यातून अपहरण केलेली अल्पवयीन मुलगी अपहरणकर्त्याने गुरुवारी रात्री परत आणून सोडली आणि काही वेळातच त्याचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह याच परिसरात आढळून आला. या मुलीच्या सुटकेसाठी दोन दिवसांपासून ठाण्यावर जमाव जात होता. यामुळे खुनासह १२ गुन्हे दाखल असलेल्या या गुंडाला कुणी संपविले, जमावाने की यामागे गुन्हेगारी विश्वातील पूर्ववैमनस्य कारणीभूत आहे, दरम्यान, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून कबुलीजबाब सुरू असल्याचे रात्री ८ च्या सुमारास सांगितले. नईम खान रहमान खान (३५, रा. एस.टी. डेपोच्या मागे) असे मृताचे नाव आहे. त्याच्या शरीरावर चाकूचे असंख्य वार असल्याचे पोलीस पंचनाम्यात पुढे आले आहे. बुधवारी दुपारी त्याच्यासह शेख अशफाक, अतुल कुसराम व चांदूरवाडी येथील एक आरोपी गारुडीपुऱ्यात शिरले. नागरिकांना या चौकडीने चाकूचा धाक दाखवीत गप्प केले व मुलीला जबरीने विना क्रमांकाच्या वाहनात बसवून पलायन केले होते. 

चांदूर रेल्वेत रात्री दीडच्या सुमारास थरार; दोन दिवसांपासून ठाण्यावर जमाव 

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : आरोपींच्या अटकेच्या व मुलीच्या सुटकेच्या मागणीसाठी त्यांनी पोलीस ठाण्यालाच घेराव केला होता. ठाणेदार विलास कुळकर्णी यांच्या नेतृत्वात तातडीने दोन पथके आरोपींच्या अटकेसाठी रवाना करण्यात आली होती.दरम्यान, शुक्रवारी सकाळी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. तथापि, त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. दुसरीकडे २४ तास होत असतानाही मुलीचा पत्ता लागलेला नसल्याने गारुडीपुऱ्यातील नागरिकांनी पुन्हा पोलीस ठाणे गाठले व सुमारे दोन तास ठिय्या दिला. नारेबाजी केली. पोलिसांनी आश्वासन देऊन त्यांना परत पाठविले. नागरिकांचा रोष पाहता अमरावती येथून आरसीपी पथक, तसेच कुऱ्हा व तळेगाव दशासर पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री नईम खान हा अपहृत मुलीला घेऊन गारुडीपुऱ्यात आला. त्याने तेथून काढता पाय घेताच तासा दिडतासाने काही अंतरावर त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दीडच्या सुमारास आढळून आला. त्याच्या शरीरावर चाकूने भोसकल्याचे असंख्य वार होते. घटनेची माहिती मिळताच ठाणेदारांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी शुक्रवारी रात्री चौघांना  अटक केल्यानंतर त्यांच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. 

चौघे ताब्यात काही जणांसमवेत मुलीला घेऊन आलेल्या नईमने शिवीगाळ करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, त्याच्या खूनप्रकरणी दीपक रतन पवार (२८), साजिद उमर ऊर्फ पप्पू आरिफ शेख (४१), अमजद खान युसूफ खान (२७) व मोहम्मद हाफिज मोहमद कादर (४२) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचा कबुलीजबाब नोंदविला जात असल्याचे पीआय कुळकर्णी म्हणाले.

चोख बंदोबस्त चांदूर रेल्वे शहरातील पोलिसांनी नईमचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबाच्या स्वाधीन केला. शुक्रवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत जगदाळे यांनी दिवसभर घटनेचा आढावा घेतला. पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुरवाडे, गीता तागडे, जमादार शिवाजी घुगे, मनोज मेश्राम, दिनेश राठोड, योगेश कडू यांनी चोख बंदोबस्त ठेवून कुठलाही शहरात अनुचित प्रकार घडू दिला नाही. 

अनेक गुन्हे शिरावर : मृत नईमच्या शिरावर खुनासह खुनाचा प्रयत्न, अपहरण, धाकदपटशा अशा प्रकारे १२ गुन्हे आहेत. संघटित गुन्हेगारीमुळे पोलीस दप्तरी कुख्यात गुंड असा त्याचा लौकिक होता. त्याला काही काळासाठी तडीपार करण्यात आले होते. 

चांदूर रेल्वे येथे २२ सप्टेंबरच्या मध्यरात्री अपहृत मुलीला घरी रात्री सोडण्यासाठी आरोपीचा अज्ञात हल्लेखोरांनी खून केला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. -  विलास कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, चांदूर रेल्वे