अमरावती : या वेळी १९ ऑगस्टला राखी पौर्णिमा आहे. या दिवशी पृथ्वीपासून सूर्याचे अंतर ३,६१,९६९ किमी राहणार आहे. अंतर कमी असल्याने या दिवशी रात्री आकाशात उगवणारा पौर्णिमेचा चंद्र नेहमीपेक्षा मोठा व प्रकाशमान राहणार आहे. याला सुपरमून म्हणतात.
पृथ्वीपासून चंद्राचे सरासरी अंतर हे नेहमी ३.८५ लाख किमी असते, हे अंतर नेहमी कमी-जास्त होत असते, सुपरमूनच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यांसारख्या घटना घडू शकतात. चंद्राची परिवलन व परिचलन या गती सारख्याच असल्याने पृथ्वीवरून आपण चंद्राचा ५९ टक्केच भाग पाहू शकतो, तर चंद्रावरून पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसते. खगोलप्रेमी व जिज्ञासूंनी १९ ऑगस्टच्या संध्याकाळी दिसणारा सुपरमून अवश्य पाहावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे प्रवीण गुल्हाणे व हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.
चंद्राचे वय ४.६५ अब्ज वर्ष
- चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ सेमी. लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल. व १०० वर्षांनी हा दिवस दोन मिलीसेकंदने मोठा होईल.
- चंद्रावर ३० हजार विवरे व २१ पर्वत आहे. पर्वत व विवरे टेलिस्कोपमधून पाहता येतात. यानंतर १८ सप्टेंबर व १७ ऑक्टोबर आणि १५ नोव्हेंबर २०२४ ला सुपरमूनचे मनोहारी दर्शन घडेल.