शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

प्रियकराने काढला प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा! गुन्ह्याची कबुली

By प्रदीप भाकरे | Published: May 02, 2023 6:01 PM

Amravati News प्रियकराने अन्य दोघांच्या साथीने विवाहित प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा काढल्याचा धक्कादायक घटना मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी येथे उघड झाली.

प्रदीप भाकरेअमरावती:  प्रियकराने अन्य दोघांच्या साथीने विवाहित प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा काढल्याचा धक्कादायक घटना मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी येथे उघड झाली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. किसन वसंत धुर्वे (४५, रा. राजुरवाडी, ता. मोर्शी) असे मृताचे नाव आहे. १ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास त्याचा मृतदेह गळा आवळलेल्या स्थितीत राजुरवाडी शेतशिवारात आढळून आला होता.

           आपल्या भावाचा कुणीतरी गळा आवळून खून केल्याची फिर्याद मृताचा भाऊ सदाशिव धुर्वे यांनी १ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास शिरखेड पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, मोर्शीचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी तातडीने तपासचक्र फिरविले व घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तथा अवघ्या १२ तासात खुनाचा उलगडा करण्यात यश मिळविले. वसंत धुर्वेचा खून अनैतिक संबंधांतून झाल्याचे स्पष्ट झाले. अटक आरोपी बबलू उर्फ इजाजखाॅ शबीरखाॅ पठाण (४०) याने साथीदार सागर रमेशराव मातकर (३०, राजुरवाडी), कृणाल जानराव उईके (२४, तळेगाव ठाकूर) व एका अल्पवयीनाच्या साथीने किसनचा खून केल्याची कबुली दिली.आरोपीला सांगितले किसन त्रास देतोयपोलीसांनुसार, आप्त महिलेचे गावातीलच बबलू उर्फ इजाजखाॅ याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची बाब किसन धुर्वे यांच्या लक्षात आल्यावर तो तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. ही बाब त्या महिलेने तिचा प्रियकर बबलू उर्फ इजाजखाॅ याला सांगितली. त्याने साथीदारासह किसनचा खून करण्याचा कट रचला.सागरने नेले जंगलात२९ एप्रिल रोजी आरोपी सागर मातकर हा किसनला राजुरवाडी शेत शिवारात घेऊन गेला. तेथे रात्री आठनंतर त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. त्याचा मृतदेह त्याच जंगलात टाकून आरोपी तेथून पसार झाले. तर दुसरीकडे २९ व ३० एप्रिल रोजी किसनचा शोध घेण्यात आला. दरम्यान, १ रोजी सकाळी मृतदेह आढळून येताच मृताच्या भावाने हत्येची फिर्याद नोंदविली.यांनी केली उलगडा मोर्शीचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तपन कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू पांडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, अंमलदार संतोष दाने, बळवंत दाभणे, पंकज फाटे, मनोज टप्पे, शकील चव्हाण, मोहन मोरे, सागर धापड, चेतन गुल्हाने, प्रमोद शिरसाट, सरिता चौधरी यांचे पथकाने अवघ्या काही तासात आरोपींना पकडण्यात यश प्राप्त केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी