गजानन मोहोड
अमरावती : पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी वाशिम जिल्ह्यातील रहिवासी उपेंद्र बाबाराव पाटील यांनी शर्ट काढून चक्क बनियानवर येऊन अर्ज दाखल केला. त्यांना विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात पोलिसांनी रोखले. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांनी परवानगी दिली व त्यांचा अर्ज स्वीकारला.
कायम विनाअनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार १०० टक्के अनुदान द्यावे, पटसंख्याच्या निकष लावून जिल्हा परिषदच्या बंद करू नये, शिक्षक, कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, पदवीधर बेरोजगार यांना न्याय मिळावा. यासाठी आपली उमेदवारी असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या उमेदवाराची चांगलीच चर्चा विभागीय आयुक्त परिसरात चांगलीच चर्चा झाली. निवडून आल्यास मागण्या मान्य होईतोवर अंगात शर्ट घालणार नाही, सभागृहात तसेच बसणार असल्याचे ते म्हणाले.