अमरावती : केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे देशभरात मार्च महिन्यात व्याघ्र प्रगणना करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रात व्याघ्र प्रगणनेत चूका झाल्याने सीलच्या निर्देशानुसार अखेर आजपासून व्याघ्र प्रगणनेला सुरुवात झालेली असून या प्रगणनेतुन हा तुर्तास ठाणे जिल्हा वगळण्यात आलेला आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार तीन वर्षानंतर भारतात व्याघ्र प्रगणना कार्यक्रम हाती घेण्यात आलेला होता, त्यानुसार देशभरातील ३९ राज्यात वाघांची मोजणी करण्यात आली. देशभरात ऑनलाईन पद्धतीने वनरक्षकांनी प्रगणना सहा दिवस पार पाडली. महाराष्ट्रात ताडोबा-अंधारी मध्ये महिला वनरक्षकास वाघाने ठार केल्याने प्रगणना खंडीत झालेली होती.
राज्यातील बिटांमध्ये प्रगणना झालेली होती. परंतु संपूर्ण राज्यातील डेटा प्राधिकरणाने गोळा केला असताना चुकीचा डेटा असल्याने राज्याच्या वनविभागावर ताशेरे ओढण्यात आले आणि महाराष्ट्राला नव्याने व्याघ्र प्रगणना करणे बाबत सूचना दिल्या होत्या. मध्यंतरी पावसाळ्यामुळे व्याघ्र प्रगणना करण्यास अडकाठी आल्याने अखेर १ ते ६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत व्याघ्र प्रगणना महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेली आहे.ठाणे जिल्हा वगळला
१ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या व्याघ्र प्रगणनेत ठाणे जिल्ह्या वगळण्यात आलेला आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी सदर जिल्ह्यात दलदल असल्याने यावेळी प्रगणना करणे शक्य नसल्याने ठाणे जिल्हा वगळलेला आहे. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात प्रगणना सुरु झालेली आहे.सुरक्षेची काळजी घ्या
ताडोबामध्ये वाघाने हल्ला केल्यानंतर महाराष्ट्रात मार्चच्या महिन्यात व्याघ्र प्रगणना घेणे बाबत वनरक्षकांचा सुर होता. परंतु व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने कारवाईचा बडगा उगारताच महाराष्ट्र वनविभागाने अखरे व्याघ्र प्रगणना हाती घेतली आहे. ६ नोव्हेंबर पर्यंत व्याघ्र प्रगणना केली जाणार आहे मात्र, नियंत्रक अधिकाऱ्याने स्थानिक परिस्थितीचा विचार करुन आपले स्तरावर व्याघ्र प्रगणनेचा निर्णय घेण्याच्या सूचना प्रधान मुख्यवनसंरक्षक वन्यजीव नागपूर यांनी दिलेल्या आहे. असे असले तरी वनरक्षक व्याघ्र प्रगणना करीत आहे. महाराष्ट्राचा डेटा गेल्यानंतर देशभरातील वाघांची आकडेवारी समोर येईल.