शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; AIIMS रुग्णालयात केले दाखल
2
“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर
3
“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार
5
“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी
6
पाकिस्तानच्या आरोपांपासून ते ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होण्याच्या प्रश्नावर Rohit Sharmaची भन्नाट बॅटिंग
7
सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली
8
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
9
"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं
10
मोठी बातमी : भारतीय संघात अचानक करावा लागला बदल, शिवम दुबे... 
11
'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?
12
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले
13
“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार
14
“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
15
₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला
16
“विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील”; रोहित पवारांचा टोला
17
"तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नात"; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या,...
18
ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा
19
विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...
20
गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

पोतदारांच्या घरातून दुर्मीळ नाण्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:49 PM

राठी नगरातील रहिवासी अरुणा प्रदीप पोतदार रविवारी मुंबईहून घरी पोहोचल्या असता त्यांना घरातून लाखो रुपये किंमतीची दुर्मिळ नाणी चोरी गेल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्देलाखोंची किंमत : राठीनगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राठी नगरातील रहिवासी अरुणा प्रदीप पोतदार रविवारी मुंबईहून घरी पोहोचल्या असता त्यांना घरातून लाखो रुपये किंमतीची दुर्मिळ नाणी चोरी गेल्याचे निदर्शनास आले. रविवारी सायंकाळी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनीही घरफोडीच्या घटनेचे गांभीर्य बघता राठी नगरातील बारबुध्दे व जावरकर यांच्या घरी भेट देऊन पोलिसांना योग्य निर्देश दिलेत.अरुणा पोतदार या मुंबई येथून रविवारी अमरावतीत परतल्या. त्यांनी घरातील साहित्याची पाहणी केली असता ग्रिलचे व दाराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरांनीे आलमारीतील लाकडी कश्मिरी क्वाईन बॉक्स लंपास केल्याचे निदर्शनास आले. या बॉक्समध्ये २०० वर्षांपूर्वीचे ४० ते ५० पुरातन नाणे होते. इंग्लड, अमेरिकेतील पुरातन नाणे, मुगलकालीन नाणे, अष्टधातुंची नाणी, तांबे-पितळांची नाणी त्या बॉक्समध्ये होते. या नाण्यांना परदेशात मोठी किंमत असून या दुर्मीळ नाण्यांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता अरुणा पोतदार यांनी वर्तविली आहे.अरुणा पोतदार यांचे सासरे अण्णा पोतदार यांना 'युनिक पीस' गोळा करण्याचा छंद होता. त्यांनीही त्यांच्या आयुष्यात ते नाणे जपून ठेवले होते. त्या नाण्यांना म्युझियममध्ये विशेष महत्त्व दिले जाते. राठी नगरातील घरफोडीच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणा सक्रियतेने काम करीत आहे.पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व सर्व ठाण्याचे पोलीस निरीक्षक व बहुतांश कर्मचारी रात्रगस्तीवर आहेत. तसेच चोरांचा शोध घेण्यासाठी १० पथके तयार करण्यात आली असून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील गुन्हेगारांची तपासणी सुरू आहे. डिटेक्शन स्कॉडसुध्दा याकामी लागला आहे. रविवारी गाडगेनगर पोलिसांनी राठी नगरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्हींची पाहणी सुरू होती.सीपींचे निर्देशराठीनगरसह संपूर्ण शहरात दोन्ही उपायुक्तांच्या नेतृत्वात सर्व एसीपी, ठाणेदार, गुन्हे शाखा, विशेष शाखा, डीबी स्कॉडने रात्रकालीन गस्त घालावी. या भागातील महिला चोरांच्या दहशतीखाली असून त्यांनी खासदारांना निवेदन दिल्याचे नमूद करून सर्व पोलीस अधिकाºयांनी रविवारी रात्री सायरन आणि व्हिस्टलचा नाईट राऊंडमध्ये वापर करावा. यात नगरसेवक आणि माध्यमांना विश्वासात घेण्याचे निर्देश आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिले.पालकमंत्र्यांची भेटराठी नगरातील काही महिलांनी पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांची रविवार भेट घेतली. त्या अनुषंगाने पोटे यांनी सायंकाळी बारबुध्दे व जावरकर यांच्या कुंटुबीयांशी चर्चा केली. चोरीच्या घटनेसंदर्भात सखोल चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी पीआय कैलास पुंडकर यांना दिले.