लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : तूर, हरभरा खरेदीचे पैसे पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना न दिल्यास स्वत:ला हातकडी लावून मंत्र्यांच्या घरात मुक्काम करण्याचे अनोखे आंदोलन करण्याचा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला. 'आसूड' यात्रेच्या निमित्ताने दर्यापुरातील बसस्थानक चौकातील वा.का. धर्माधिकारी कन्या शाळेच्या प्रांगणात ते बोलत होते.मंचावर प्रदीप चौधरी, अनिल भडांगे, नितीन देशमुख, महेश कुरळकर, डॉ. दिनेश म्हाला, प्रदीप वडतकर यांच्यासह अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. संचालन बापूसाहेब साबळे व आभार प्रदर्शन डॉ. म्हाला यांनी केले. त्यांनी काँग्रेसवरही कोरडे ओढले. बजेटमधेही शेतकऱ्यांसाठी दुजाभाव असून, उद्योगांना वेगळा न्याय आहे, असे काँग्रेसला बोलण्याचा अधिकार नसून, त्यांचे सरकार असताना स्वामिनाथन आयोगाच्या चिंध्या फाडणारे हेच आहेत. ७० वर्षांत देशात आरोग्यसेवा पुरवू शकले नाही. आमदार-खासदारांना लाखो रुपये, वैद्यकीय सेवा मंजूर करणारे शासन शेतकऱ्यांना तारू शकत नाही. प्रसंगी पंतप्रधानांच्या कार्यालयात घुसू, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
...तर पंतप्रधानांच्या कार्यालयात घुसू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:25 PM
तूर, हरभरा खरेदीचे पैसे पेरणीपूर्वी शेतकºयांना न दिल्यास स्वत:ला हातकडी लावून मंत्र्यांच्या घरात मुक्काम करण्याचे अनोखे आंदोलन करण्याचा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला.
ठळक मुद्देबच्चू कडू : आसूड यात्रेला शेतकऱ्यांची गर्दी