शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विद्युत प्रवाहाने १४ जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 10:03 PM

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर परिसरात १०, तर दर्यापूर तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात चार जनावरे विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने २४ तासांत दगावली. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या परिणामी वरूड तालुक्यात लाखोंचे नुकसान झाले. याशिवाय उमरी मंदिर येथे आठ ते दहा घरांची पडझड झाली.

ठळक मुद्देवादळी पावसाचा फटका : शिरपूर येथे १० जनावरांचा मृत्यू; येवदा, सावंगीतही थैमान

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर/येवदा/सावंगी जिचकार : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर परिसरात १०, तर दर्यापूर तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात चार जनावरे विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने २४ तासांत दगावली. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या परिणामी वरूड तालुक्यात लाखोंचे नुकसान झाले. याशिवाय उमरी मंदिर येथे आठ ते दहा घरांची पडझड झाली.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर येथे शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे गावठाण फीडरच्या उच्चदाब वाहिनीचे फेज तार गुंतल्याने शाॉर्ट सर्कीट झाले. त्यामुळे वीज प्रवाह खांब तसेच तणावाच्या तारांमधून ओल्या जमिनीत संचारला. यावेळी शिवारात आसपास चरत असलेल्या १० गाई वीजप्रवाहाच्या संपर्कात आल्याने दगावल्या. यामध्ये विश्वेश्वर पुसदकर, किसनराव पुसदकर, महेंद्र चव्हाण, दिगंबर उके, मनोहर ढोरे, माया सोनोने, दामोजी सोनोने, निवृत्ती सोनोने यांची प्रत्येकी एक, तर मुकुंदराव बर्डे यांच्या दोन गाई आहेत. गुराखी उकंडराव बर्डे यांनी प्रसंगावधान राखून आपला जीव वाचविला. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विलास शिंदे, कनिष्ठ अभियंता प्रतीक ढवळे यांच्या उपस्थितीत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.येवद्यातही पावसाचा कहरयेवदा परिसरातील पिंपळखुटा शिवारात शुक्रवारी सायंकाळी ४ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी प्रवीण ढोरे यांच्या शेतातील झाड विद्युत तारेवर पडले. जमिनीवर आलेल्या विद्युत तारांचा विनोद कराड, दिलीप काळे यांच्या गार्इंना स्पर्श झाल्यामुळे त्या ठार झाल्या. मालाबाई टापरे यांच्या दोन बकऱ्याही दगावल्या. तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी पंचनामा केला. लगतच्या उमरी मंदिर येथील आठ ते दहा घरांची पडझड झाली असून, गावकºयांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.सावंगी परिसरात थैमानवरूड तालुक्यातील सावंगी (जिचकार) सह गणेशपूर,जामठी, एकलविहीर परिसरात वादळी पावसाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास थैमान घातले. यामुळे सावंगी गावातील घरावरील छप्पर, टिन, कौल उडाले, तर घरेसुद्धा कोलमडून पडली. तर शेखर वानखडे यांच्या घराचे छत उडाल्याने साठवून ठेवलेला चणा पाण्याने पूर्णत: खराब झाला. शंकर शेळके यांच्या घरासह अनेकांचे घरांचे छत उडाले. किशोर बूब यांच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळल्याने कडबा, कुटार तसेच कृषिअवजारे भस्मसात झाली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. गावातील घराची पडझड आणि छप्पर उडाल्याने अनेकांना बेघर होण्याची वेळ आली. झाडेसुद्धा उन्मळून पडली. यामुळे काही काळ वाहतूक बंद पडली असल्याचे सांगण्यात येते. गणेशपूर, जामठी, एकलविहीर परिसरातसुद्धा मोठया प्रमाणात नुकसान झाले.