लोकमत न्यूज नेटवर्कसंदीप मानकर/अमरावती : विभागातील १७४९ सहकारी दुग्ध संस्था जून २०१८ च्या अहवालानुसार अवसायनात निघाल्याची माहिती आहे. यामध्ये १०७ प्राथमिक संस्था बंद अवस्थेत, तर फक्त १२१ प्राथमिक संस्था पश्चिम विदर्भात कार्यरत आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील नोंदणीकृत ४० संस्थांचा समावेश आहे. मात्र, अवसायनात निघालेल्या संस्था पुनर्जीवित करणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी संबंधित विभागाचे प्रयत्न शून्य दिसून येत आहे. विदर्भात हजारो लीटर दुधाची रोजची आवक होत आहे.अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यांत १९७७ प्राथमिक संस्था नोंदणीकृत होत्या. त्यापैकी १७४९ संस्था जून २०१८ पर्यंत अवसायनात निघाल्यामुळे दुग्ध व्यवसायला शासकीय पातळीवर उतरती कळा आली आहे. सहकार विभागाकडे नोंदणीकृत प्राथमिक सहकारी दुग्ध संस्थेचे आॅडिट न करणे, नियमानुसार दर पाच वर्षाला संस्थेच्या निवडणुका न घेणे, सहकार कायदा १९६० नियम १९६१ नुसार तरतुदीचे पालन न करणे, नियमित दुग्ध संकलन न करणे, संस्थेचे नियमित रेकॉर्ड न ठेवणे आदी बाबींमुळे त्या-त्या सोसायटीच्या सहायक निबंधकांनी सदर संस्था अवसायनात काढल्या आहेत. अनेक संस्थांवर नियमानुसार अवसायकाची निवडसुद्धा करण्यात आली आहे. मात्र, सदर संस्था, पुनर्जीवित करण्यासाठी शासनाचे प्रयत्न शून्य असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला शासनाकडूनच प्रोत्साहन दिले जात आहे, तर दुसरीकडे शासकीय यंत्रणेपेक्षा खासगीत दुधाला चांगले भाव मिळत असल्याने अनेक दुग्ध व्यवसायकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अवसायनात निघालेल्या संस्था पुन्हा कशा सुरू करता येतील? त्यांना मुख्य प्रवाहात कसे आणता येतील? याकरिता दुग्ध विकास विभागाने प्रयत्न करावे, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नोंदणीकृत प्राथमिक संस्था सुरू संस्था बंद संस्था अवसायनातील संस्था(जुन २०१८ पर्यंत) अमरावती ५२३ ४० ०१ ४८२अकोला १७१ १८ ४९ १०४वाशिम ११२ १४ ०२ ९६यवतमाळ ५९५ २५ ११ ५५९बुलडाणा ५७६ २४ ४४ ५०८एकूण १९७७ १२१ १०७ १७४९संस्थेच्या सभासदांना जर संस्था पुनर्जीवित कराव्याची असेल तर त्यांनी नियमानुसार आवश्यक अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. त्यांनी सहकार कायद्यातील तरतुदींची पालन केल्यास संस्था पुनर्जीवित करणे शक्य आहे.- अनिरुद्ध राऊत, सहायक निबंधक सह. संस्था (पदुम)
अमरावती विभागातील १७४९ सहकारी दुग्ध संस्था अवसायनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 11:26 AM
अमरावती विभागातील १७४९ सहकारी दुग्ध संस्था जून २०१८ च्या अहवालानुसार अवसायनात निघाल्याची माहिती आहे.
ठळक मुद्दे१०७ संस्था बंद संस्था पुनरुज्जीवनाकरिता प्रयत्न शून्य