शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे २३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 1:17 AM

स्वाइन फ्लूच्या अनुषंगाने जिल्ह्यातून १ जानेवारी ते १५ एप्रिल दरम्यान तपासणीला पाठविण्यात आलेले २३ रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आले होते. महापालिका हद्दीतील १४ व ग्रामीण भागातील नऊ रुग्णांचा यात समावेश आहे.

ठळक मुद्दे५१ स्वॅबची तपासणी : ग्रामीण भागात ९ रुग्ण

इंदल चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वाइन फ्लूच्या अनुषंगाने जिल्ह्यातून १ जानेवारी ते १५ एप्रिल दरम्यान तपासणीला पाठविण्यात आलेले २३ रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आले होते. महापालिका हद्दीतील १४ व ग्रामीण भागातील नऊ रुग्णांचा यात समावेश आहे.जिल्ह्यात स्वाइन फ्लूने मागील वर्षी कहर केला. महापालिका हद्दीत अशा रुग्णांचे प्रमाण अधिक होते. त्या तुलनेत ग्रामीण भागात कमी असले तरी स्थिती चिंताजनक होती. त्यामुळे स्वाइन फ्लू आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी अवघ्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लागली होती. ज्या भागात असे रुग्ण आढळून आलेत, त्या परिसराचे सर्वेक्षण, संशयितांच्या स्वॅबची तपासणीसाठी रवानगी, स्वच्छतेची शहानिशा आदी कामात आरोग्य कर्मचारी व्यस्त झाले होते. अनेकांचा आजार बरादेखील झाला. परंतु, तो पूर्णत: नष्ट झाला की नाही, हे पाहण्याकरिता जिल्हा आरोग्य यंत्रणेने १ जानेवारीपासून शहरी व ग्रामीण भागात सर्वेक्षण केले. ५१ संशयितांचे स्वॅब तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी २३ रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला.स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यापासून ३६ तासांच्या आत टॅमी फ्लूचा उपचार घेतल्यास हा आजार निश्चित बरा होतो. याची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा सामान्य रुग्णालयात केली जाते. आरोग्य विभागाने रुग्णांच्या आवश्यकतेनुसार आजाराला प्रतिबंधक औषधीदेखील उपलब्ध केल्या आहेत.स्वाइन फ्लू हा विषाणुमुळे होणारा आजार आहे. याचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्याला हवेमार्फत होतो. त्यामुळे खोकलताना, शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा, हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत, भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी.- सुरेश असोले,जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूHealthआरोग्य