४२६ पदे रिक्त प्राथमिक आरोग्य, उपकेंद्रांतील वास्तव
अमरावती : यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने आरोग्य फोकस केला. असे असले तरी जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३३३ उपकेंद्रांतील आरोग्य सेवक, सेविकांची ४१६ पदे रिक्त असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आरोग्य विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार, जिल्ह्यात ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माण अधिकारी, दोन आरोग्य सेवक, आरोग्य सेविका याप्रमाणे कर्मचारी आवश्यक आहेत. या केंद्रात ३४२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २८१ भरलेली प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व अन्य मिळून ६१ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात ३३३ आरोग्य उपकेंद्रे असून, प्रत्येक उपकेंद्रात दोन आरोग्य सेविका,आरोग्य सेवक असणे क्रमप्राप्त आहे. परंतु, एकूण ८८६ मंजूर पदांपैकी ५३१ कर्मचारीच कार्यरत आहेत. ३५५ विविध संवर्गातील पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्याच्या विविध उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. जिल्हाभरातील रिक्त असलेली आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांतील ४१६ रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.
बॉक्स
जिल्ह्यात २३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त
जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ची १३१ पदे मंजूर आहेत. यातील १२७ कार्यरत आहेत, तर चार पदे रिक्त आहेत. याशिवाय गट ‘ब’ची ११० पदे मंजूर असून ९१ पदे भरली आहे. यामधील १९ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, २१७ पदे जी भरली आहेत, त्यामध्ये ६१ कंत्राटी व तीन बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.
बॉक्स
आकडेवारी अशी
प्राथमिक आरोग्य केंद्र ५९
रिक्त पदसंख्या ६१
आरोग्य उपकेंद्रे ३३३
रिक्त पदसंख्या -३५५
कोट
जिल्ह्यात ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, तर ३३३ उपकेंद्रे आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांची बरीच पदे भरलेली आहेत. मात्र, आरोग्य सेवकांनी सेविकांची अनेक पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे लवकरच भरली जातील, अशी आशा आहे.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी