लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी महावितरणने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीजग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन किंवा तीनपेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभांची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. ग्राहकांना लकी ड्रॉद्वारे स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.
महावितरणची 'लकी डिजिटल ग्राहक' योजना'लकी डिजिटल ग्राहक' योजना ही महावितरणचे बिल ऑनलाइन भरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी सुरू केली आहे. यामध्ये १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन किंवा तीनपेक्षा अधिक वीज बिले ऑनलाइन भरून या योजनेचा लाभ घेता येईल.
एप्रिल, मे व जूनमध्ये ड्रॉ काढणारमहावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाइन पद्धतीने काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत.
फक्त डिजिटल पेमेंट ग्राह्य धरणारयोजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस, इ. ऑनलाइन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर सलग तीन महिने बिल भरणे गरजेचे आहे.
फक्त लघुदाब ग्राहकांसाठी ही योजनालकी डिजिटल योजनेसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीजग्राहकच या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
"ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा."- दीपक देवहाते, अधीक्षक अभियंता