प्रवीण पोटे यांचे प्रतिपादन : गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरवअमरावती : परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही. मनात ध्येय ठेवून ते मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळवणे कठीण जात नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवण्ीा पोटे यांनी व्यक्त केले.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित एमपीएससी व यूपीएससीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. मंचावर अॅकॅडमीचे रुपेश जाधव, एमपीएससी व यूपीएसीमध्ये यश प्राप्त करणारे अभय देवरे, स्वप्निल वानखडे, सोनाली जवंजाळ, स्वाती काकडे आदी उपस्थित होते. पालकमंत्री पोटे म्हणाले, या कार्यक्रमात जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना अभिमान वाटतोे. माझ्या मातीतील विद्यार्थी आयएएस झाले याचे मला अत्यंत आनंद होत आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांपासून प्रेरणा घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे आयएएस झाले पाहिजे. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले की मागील १० ते २० वर्षांतील पेपर सेट जर आपण सोडवले व चिकाटीने आपल्या ध्येयाकरिता परिश्रम केले तर आयएएस व आयएपीएस होणे कठीण नाही. या वर्षापासून आपण आएएएसचे ध्येय मनात ठेवावे. काही अडचणी आल्यास त्या सोडवावे. अपयशाने कधीच खचून न जाता आपले ध्येय मिळेपर्यंत प्रयत्न करीत रहावे. मी आएएस झालो हे मनात ध्येय ठेवून प्रयत्न करा. आपण नक्की यशस्वी व्हाल, असा धीर त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.प्रारंभी एमपीएससी व यूपीएसीमध्ये यशस्वी झालेले अभय देवरे, स्वप्निल वानखडे, सोनाली जवंजाळ यांचा व त्यांच्या पालकांचा पालकमंत्री पोटे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. एमपीएससी व यूपीएससीचे दहा विद्यार्थी व विद्यार्थिनी दत्तक घ्यावे असे अॅकॅडमीचे रुपेश जाधव यांनी ना.पोटे यांना विनंती केली. सूत्रसंचालन अॅकॅडमीचे विद्यार्थी राहुल यांनी केले.
परिश्रम केल्याशिवाय यश प्राप्ती नाही
By admin | Published: September 01, 2015 12:03 AM