पत्रपरिषद : पालकमंत्री यांचा गौप्यस्फोटअमरावती : नांदगावपेठ एमआयडीसी क्षेत्रात साकारण्यात आलेला सोफिया तर आता नामकरण झालेला रतन इंडिया औष्णिक वीज प्रकल्पातून तीन ते चार रुपये युनीट दराने जिल्ह्याला वीज मिळणार यासंदर्भाचा शासन दरबारी कुठेही करार नसल्याचा गौप्यस्फोट पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे सोमवारी पत्रपरिषेदत केला. पालकमंत्र्यांनी दिलेल्या या माहितीने यापुर्वीच्या आघाडी शासनाने शुद्ध फसवणूक केल्याची बाब आता उघडक ीस येवू लागली आहे.येथील शासकीय विश्रामभवनात सार्वजनिक बांधकाम विभाग व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ना. पोटे यांनी औष्णिक प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय लाभदायक असला तरी जिल्ह्याला या प्रकल्पातून कमी दरात वीज मिळेल, असा गाजावाजा त्यावेळी करण्यात आला होता. परंतु तसा कोठेही करार झाल्याच्या नोंदी नाहीत. केवळ मौखीकरित्या शासनकर्त्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
‘सोफिया’तून कमी वीजदराचा करार नाही
By admin | Published: April 14, 2015 12:28 AM