बॉक्स
मजुरांच्या कार्यक्षमतेवरून मजुरीचा दर
सन १९७८ मध्ये माणसाला ५ रुपये, तर महिला मजुराला दीड रुपय रोज मिळत होते. दिवसभरात कामही भरपूर करवून घेतले जायचे. कालांतराने यांत्रिकी शेतीचा पायंडा पडत गेला. मजुरांचा उपयोग कमी-कमी होत गेला. त्यामुळे माणसाची कार्यक्षमतीदेखील कमी होत गेली. वाढत्या महागाईच्या तुलनेत मजुरीचे दरही वाढून सद्यस्थितीत माणसाला ४०० व बायांना २५० रुपये रोजंदारी मिळत आहे.
--
शेती व्यवसाय चार घटकावर अवलंबून
शेती व्यवसायात उन्नती साधायची असेल तर चार घटकांवर काम करणे गरजेचे आहे. पैसा, मजूर, जमीन, साहस, संघर्ष करण्याची तयारी असावी लागते. जमीन कोणत्या पिकासाठी योग्य आहे, याचे आकलन होणे गरजेचे आहे. वेळेत मजूर मिळवण्याची कला हवी, शेतीसाठी हवा तसा पैसा असावा आणि शेतकऱ्यांमध्ये निर्णयक्षमता असणे गरजेचे आहे. कोणत्या वेळेला पेरणी करावी, खत केव्हा द्यावे, फवारणीत कोण्या कंपनीचे औषध वापरावे, यावर एकचित्त ठेवून धडाडीने निर्णय घेतल्यास शेती व्यवसाय फायद्याचाच ठरेल, असेही ते म्हणाले.