शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA  Live Match : भारतीय संघाने टॉस जिंकून अर्धी लढाई जिंकली, रोहित शर्माचा सहकाऱ्यांना सल्ला
2
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
3
“राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे चेहरे केले असते तर २५ ते ३० जागा वाढल्या असत्या”: संजय राऊत
4
संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान
5
“मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान
6
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
7
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
8
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
9
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना
10
"अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग’’, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप 
11
भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?
12
बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे
13
"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव
14
सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
15
“लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार
16
भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड
17
पुण्यातील पब्स आणि बारवर महापालिकेची कारवाई, मराठी अभिनेता म्हणतो- "इतकी वर्ष मोकाट चालू दिलं..."
18
गजकेसरी योग: ८ राशींना लाभच लाभ, भाग्याचा काळ; यश-प्रगती, पदोन्नती-नफा कमवायची संधी!
19
काय हे आयसीसी...! विजेत्या संघाला किती बक्षीस मिळणार? IPL पेक्षा काही लाखच जास्त...
20
बुलडोझर बाबाचा बुलडोझर गरीब आणि मागासवर्गीयांवर का? पवईतील अतिक्रमण कारवाईवरुन विजय वडेट्टीवार आक्रमक

अमरावती जिल्ह्यातील आश्रमशाळांना गेल्या तीन महिन्यांपासून तांदूळ पुरवठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:09 PM

अमरावती शासकीय आश्रमशाळांमध्ये नांदेड येथील पारसेकर अँड कंपनीने गेल्या तीन महिन्यांपासून तांदूळ पुरवठा केला नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरुद्ध ‘ब्लॅकलिस्ट’ची कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देनांदेड येथील पुरवठादाराविरुद्ध ‘ब्लॅकलिस्ट’ची कारवाईआश्रमशाळांना तांदूळ पुरवठ्याचे प्रकरणअंतिम नोटीस बजावली, अनामत रक्कमही होणार जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालांतर्गत सात प्रकल्पस्तरांवरील शासकीय आश्रमशाळांमध्ये तांदूळ पुरवठ्याचा कंत्राट सोपविला असताना, नांदेड येथील पारसेकर अँड कंपनीने गेल्या तीन महिन्यांपासून पुरवठा केला नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरुद्ध ‘ब्लॅकलिस्ट’ची कारवाई केली जाणार आहे. अपर आयुक्तांनी अंतिम नोटीस बजावली आहे.आदिवासी विकास विभागाने २ जून २०१८ रोजी अकोला, धारणी, कळमनुरी, पांढरकवडा, पुसद, किनवट, औरगांबाद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ८१ शासकीय आश्रमशाळांमध्ये २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात अन्नधान्य, कडधान्य, किराणा व मसाले साहित्य पुरवठा करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविली. नांदेड येथील पारसेकर अँड कंपनीकडे प्रतिक्विंटल १९३० रुपये दराने आश्रमशाळांना तांदूळ पुरवठ्याचा कंत्राट सोपविला गेला. संबंधित कं त्राटदारांना २८ जून २०१८ रोजी तांदूळ पुरवठा करण्याबाबत आदेशपत्र देण्यात आले. १ जुलैपासून आश्रमशाळांना तांदूळ पुरवठा करणे अपेक्षित होते. मात्र, तीन महिने लोटले तरी कंत्राटदाराने आश्रमशाळांना तांदूळ पुरवठा केला नाही.अमरावतीचे एटीसी गिरीश सरोदे यांनी १० आॅक्टोबर २०१८ रोजी यासंबंधी नोटीसदेखील बजावली. सात दिवसांच्या आत सदर कंत्राटदाराकडून उत्तर मागविले आहे.आश्रमशाळा व्यवस्थापनाची कसरतई-निविदेनंतरही आश्रमशाळांना तांदूळ पुरवठा होत नसल्याने विद्यार्थ्यांना आहार देताना अधीक्षक, मुख्याध्यापकांना कसरत करावी लागत आहे. गत तीन महिन्यांपासून बाजारातून तांदूळ खरेदी करु न विद्यार्थ्यांना आहारात भात दिला जात आहे. मात्र, ही गैरसोय करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाईसाठी उशिरा पावले उचलल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सदर कंत्राटदाराविरुद्ध कारवाईसाठी अंतिम नोटीस बजावली आहे. येत्या काही दिवसांत ही एजन्सी ‘ट्रायबल’मध्ये काळ्या यादीत असेल. आश्रमशाळांमध्ये लवकरच नियमित तांदूळ पुरवठा केला जाईल. बँक अनामत रक्कमही जप्त करण्यात येणार आहे.- गिरीश सरोदे, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती.

टॅग्स :GovernmentसरकारSchoolशाळा