शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पेट्रोलपंपांची तांत्रिक तपासणी नाही

By admin | Published: June 19, 2017 12:12 AM

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पेट्रोलपंपांवर इंधन चोरी होत असताना जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोलपंपांची तांत्रिक तपासणी केव्हा करणार, ...

चालकांना सवाल : इलेक्ट्रिक चीप वापरून पेट्रोल चोरी लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पेट्रोलपंपांवर इंधन चोरी होत असताना जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोलपंपांची तांत्रिक तपासणी केव्हा करणार, असा सवाल वाहन चालकांकडून केला जात आहे. इलेक्ट्रिक पल्सर चीपद्वारे पेट्रोल पंपावर चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. सततच्या पेट्रोल, डिझेल दराच्या वाढीमुळे अगोदरच वाहन चालक हैराण झाला आहे. मात्र पेट्रोल पंप चालकांकडून आधुनिक तंत्रनाज्ञानाचा वापर करुन इंधन चोरीच्या नावे वाहन चालकांच्या खिशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत असेल तर या गंभीर बाबीला जबाबदार कोण? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या नियंत्रणात पेट्रोलपंप चालविले जातात. परंतु या पेट्रोलपंपांवर विक्री होणारे इंधन हे भेसळयुक्त तर नाही, हे तपासण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाची आहे. किंबहुना वाहनचालकांसाठी शौचालय, बाथरुम, पिण्याचे पाणी, वाहनात हवा भरण्याची सोय आदी महत्त्वाच्या बाबी असणे अनिवार्य आहे. मात्र, शहरातील ९९ टक्के पेट्रोलपंपांवर वाहन चालकांसाठी कोणत्याही सोईसुविधा नसल्याचे वास्तव आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर काही मोजक्याच पेट्रोलपंपांवर जुजबी सुविधा आहे. तरीही जिल्हा प्रशासन अशा पेट्रोलपंपांना सील का करीत नाही? हे महत्त्वाचे आहे. पेट्रोलपंपांवर तांत्रिक तपासणीची जबाबदारी अपर जिल्हाधिकाऱ्यांची आहे. वाहन चालकांकडून पूर्ण पेट्रोल दिल्याचे भासविले जाते. प्रत्यक्षात वाहनात कमी पेट्रोल मिळत असल्याची अनेक वाहनचालकांची ओरड आहे. वाहन कमी चालल्यानंतरही अधिक इंधन लागते, हा अनेक दिवसांपासूनचा शिरस्ता आहे. वाहनातून नेमके इंधन जाते कोठे, हा सवाल उपस्थित होत आहे. शहरातील काही पेट्रोलपंप चालक इलेक्ट्रिक पल्सर चीपद्वारे पेट्रोलची चोरी करीत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोलपंपाची तांत्रिक तपासणी केली जात नसल्याने पंप चालकांच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या चोरीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाच लिटरमागे २०० मिलिमीटरची चोरी पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक आणि पेट्रोल चोरीने कळस गाठला आहे. इलेक्ट्रिक चीपचा वापर करुन पंपावर पाच लिटरमागे २०० मिलिमीटर पेट्रोलची चोरी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. पेट्रोल चोरीचे हे सत्र शहरासह ग्रामीण भागातही सुरू असून यावर जिल्हा प्रशासन, पोलिसांच्या गुन्हे शाखेने निर्बंध आणावा, अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. शहरात सुमारे २५ तर ग्रामीण भागात ८४ पेट्रोल पंप आहेत. यापूर्वी पेट्रोलपंपांची प्राथमिक तपासणी केली असता काही उणिवा किंवा दोष आढळले नाहीत. मायक्रो चीप वापरुन पेट्रोलची चोरी होत असल्याची तक्रारी मिळाली. मात्र तंज्ज्ञ चमूअभावी तशी तपासणी करता आली नाही. - डी.के. वानखडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अमरावती माझ्याकडे नवीन दुचाकी वाहन आहे. मात्र कंपनीद्वारे दिल्याप्रमाणे वाहनाला मायलेज मिळत नाही. वाहनात पेट्रोल टाकून हैराण झालो आहे. कदाचित पेट्रोल पंपातूनच पेट्रोलची चोरी होत असावी, यात दुमत नाही. - विकास डोंगरे, राहुलनगर, बडनेरा