जिल्ह्यातील १४ तालुक्यात सरासरी आतापर्यंत ४२३.३ मिमि पाऊस अपेक्षित होता. त्यापैकी प्रत्यक्षात ४२७.३ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याचे टक्केवारी ९८.८ आहे. तसेच जिल्ह्यातील एक मोठा पाच मध्यम व ८४ लघु असे एकूण अशा ९० प्रकल्पात सरासरी ५४.४६ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती शहराला पाणीपुरठा करणारा ५८.२९ टक्के पाणीसाठा असतानाही शहराला एक दिवसआड पाणीसाठा होत असल्याने नागरिकांनी ओरड वाढली आहे.
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. प्रकल्पातही चांगला पाणीसाठा साचला आहे. त्यामुळे रबीला सिंचनाकरीता पाणी मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंद आहे. मात्र अनेक तालुक्यात मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणात पाणी असताना नियमीत नळात पाणी का येत नाही असा सवाल नागरिकांचा असून जीवनप्राधीकरण व संबधीत पाणीपुरवठा यंत्रणेने या संदर्भात दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.
जिल्ह्यात झालेला पाऊस (मि. मी)
तालुका अपेक्षित प्रत्यक्षात टक्केवारी
अमरावती ४३९.७ ३८४.४ ८७.४
मोर्शी ३९१.६ ३५५.३ ९०.७
अचलपूर ४१५.३ ४०१.१ ९६.६
चिखलदरा ६५३.५ ४६४.५ ७१.१
धारणी ५३८.३ ४५३.३ ८४.२
अंजनगाव ३०८.५ ५०७.५ १६४.५
धरणांमधील साठा
प्रकल्प संख्या उपयुक्त (दलघमी) टक्केवारी
मोठे १ ३२६.८१ ५८.२९
मध्यम ५ ११०.१५ ५०.६०
लघु ८४ ११०.५६ ४८.३६
बॉक्स:
उर्ध्व वर्धात ५८.२९ टक्के साठा
शहराला एक दिवसाआड पाणी
अमरावती शहराला पाणीपुरठा करणाऱ्या उधर्व वर्धा प्रकल्पात आतापर्यंत सरासरी ५८.२९ टक्के पाणीसाठा साचला आहे. अमरावती शहरातील ९३ हजार नळधारकांना या प्रकल्पातून जीवनप्रधिकरणा मार्फत पाणीपुरठा करण्यात येत आहे. धरणात मोबलक पाणीसाठा असतानाही अमरावतीकरांना एक दिवसाआड पाणीपुरठा करण्याचे धोरण अधिकाऱ्यांनी आखले आहे. त्यामुळे नागरिकांची ओरड वाढली आहे.
कोट
शहरवासीय म्हणतात नळा पाणी का नाही?
कोट
धरणात मोबलक पाणीसाठा असल्याचे वृत्तपत्रातूनच माहिती मिळते मात्र शहरात जीवनप्राधीकरण एकदिवसाआड पाणीपुरठा करते. नळ येण्याची वेळ सुद्धा निश्चित नसते. त्यामुळे नोकरदार वर्गांना त्रास होतो. नियमित पाणीपुरठा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.
गजानन कोरे, नागरिक अमरावती
कोट
दर्यापूर शहराला शहानुर धरणातून शहानुर पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरठा करण्यात येते. धरणात यंदा चांगली पाणी आहे. मात्र शहराला एक ते दोन दिवसातून पाणीपुरठा करण्यात आला. काही दिवसापुर्वी नळाला गढूळ पाणी आले. पाणीपुरठा १५ दिवस बिल मात्र महिनाभराचे आकरण्यात येत असून हे चुकीचे आहे.
राजेंद्र गायगोले, नागरिक दर्यापूर
बळीराजा आनंदला
कोट
यंदा पाऊस चांगला झाल्याने जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र धरणात चांगला पाणीसाठा झाल्याने रबी पिकाला सिंचनाकरीता पाणी मिळणार आहे. तसेच वर्षभराची पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने आनंद आहे.
एक शेतकरी