टँकरने पाणी पुरवठा : नागरिकांची ससेहोलपट; नियोजनाअभावी आले संकटगजानन नानोटकर पुसलापुसला येथे खापरखेडा येथून पाणी पुरवठा केला जात होता. परंतु पाणी पुरवठा योजनेचा मोटरपंप जळाल्याने व पर्यायी व्यवस्था नसल्याने मागील १५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी पाणी पुरवठ्यासाठी टँकरची व्यवस्था केली. मात्र नियोजनाअभावी ऐन हिवाळ्यात तांत्रिक बिघाडामुळे गावाला कृत्रिम पाणी टंंचाईला सामोरे जावे लागत आहे. पुसला हे गाव १५ हजार लोकवस्तीचे आहे व १ हजार ६०० नळ कनेक्शन आहे. दिवसेंदिवस गावाचा व्याप वाढत आहे. गावात वजनदार नेते असतानासुध्दा या गावाला अनेक समस्यांना नेहमीच सामोरे जावे लागत आहे. याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामस्थांना सुविधा दिल्या जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे. गत अनेक वर्षापासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राजाश्रय नसल्याने पाणी समस्या मात्र पाचवीलाच पुजली आहे. खापरखेडा ग्रामपंचायतीला होणारा पाणी पुरवठा केंद्रावरची मोटरपंप जळाल्याने गावात पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे कुणी शेतातून तर कुणी अन्य ठिकाणाहून पाणी आणत आहे. अखेर नगारिक चिडल्याने तहसीलदार यांनी पाणी पुरवठ्यासाठी टँकर सुरु करण्योच आदेश काढले. गरजेपुरते पाणी नागरिकांना दिल्या जात आहे. मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेता नियोजन होत नाही तर याकडे ेग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नियमित पाणी पुरवठा होत नाही. अनेक महिण्यापासून पाणी टंचाई होत असतांना यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. पांढरी इंधन विहिरीवरुन पुनर्वसन भागात पाणी दिल्या जाते तर मुख्य गावात वाई (खुर्द) येथून पाणी पुरवठा होतो. पाच लक्ष लिटर क्षमतेची पाणी पुरवठा टाकी आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना या गावाला मंजूर झाली असतांना अद्यापही पाईपलाईन नियमीत करणे तसेच जलशुध्दीकरण केंद्र उभारणीचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे. पाणी टचांर्ईमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
ऐन हिवाळ्यात पुसला येथे पाणी टंचाई
By admin | Published: December 31, 2015 12:10 AM