शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
2
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
3
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
4
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
5
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
6
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
7
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
8
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
9
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
10
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
12
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
13
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
14
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
15
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
16
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
17
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
18
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
19
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
20
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान

साथरोग प्रतिबंधासाठी ७७ पथकांचा राहणार वाॅच

By जितेंद्र दखने | Published: June 26, 2024 10:02 PM

जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून नियोजन

अमरावती: जिल्ह्यात मान्सूनमध्ये साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता आरोग्य विभाग सज्ज झाला असून, ७७ पथक आरोग्य विभागाने सक्रिय केले आहे. या ७७ पथकांवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांचे सात सदस्यीय पथक नियंत्रण ठेवणार आहे. मान्सूनपूर्व आढावा अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. यंदादेखील जिल्हास्तरावर सात सदस्यीय पथक तयार केले आहे. यामध्ये एका अधिकाऱ्यांना दोन तालुक्यांची जबाबदारी दिली आहे.

याशिवाय १४ तालुकास्तरावर एक स्वतंत्र पथक गठित केले आहे. अशा प्रकारे १४ पथक तालुक्यात भेट देऊन साथरोगावर प्रतिबंधासाठी वॉच ठेवणार आहे.जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरदेखील तीन ते चार कर्मचाऱ्यांचे भरारी पथक कार्यरत राहणार आहे. या पथकाकडे आरोग्य केंद्रांतर्गत जी गावे आहेत, तेथे आरोग्य सुविधा पुरवाव्या लागणार आहे. या जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ७७ भरारी पथक काम करणार आहे. जिल्ह्यात याची अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.

संपर्क तुटणाऱ्या २० गावांमध्ये मुख्यालयी व्यवस्थामेळघाटात धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांमध्ये पावसामुळे संपर्क तुटणाऱ्या २० गावांमध्ये मुख्यालयीच सर्व सुविधा आरोग्य विभागाच्या वतीने पुरविण्यात आल्या आहे. येथे २० गावात प्रत्येकी १ भरारी पथक गठित करण्यात आले आहे. या पथकात ४ ते ५ कर्मचारी राहणार आहे. या कर्मचाऱ्यांकडे आरोग्य किट दिली आहे. यामध्ये साथरोगाबाबतच्या सर्वच प्रकारच्या औषधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती