सुलभा खोडके यांची माहिती, उपमुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता
अमरावती : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्था अंतर्गत गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ मिळावा तसेच विविध उपक्रम राबविण्यासाठी अमरावती येथे सारथीचे विभागीय प्रशिक्षण केंद्र निर्माण होणार असल्याची माहिती आमदार सुलभा खोडके यांनी दिली. या महत्वपूर्ण बाबीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे.
पुणे येथे १९ जून रोजी झालेल्या बैठकीत सारथी संस्थेला आवश्यक निधी, स्वायत्तता देण्याची घोषणा करण्यात आली. अमरावती येथे सारथीचे विभागीय कार्यालय सुरू करावे, असे पत्र आमदार सुलभा खोडके यांनी ना. अजित पवार यांना दिले होते. त्याअनुषंगाने या मागणीचा प्रर्खषाने विचार करण्यात आला, हे विशेष. त्यामुळे अमरावती विभागातील शासनस्तरावर मराठा समाजातील तरुणांचे शैक्षणिक व नोकरीसंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी हे केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरु असलेल्या व्याज परतावा योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे.
०००००००००००
सारथीला बळकटी मिळणार
मराठा समाज व कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी सारथीची स्थापना करण्यात आली. या समाज घटकांना संशोधन, प्रशिक्षण, शैक्षणिक सुविधा व वसतिगृहे आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन आदी उपक्रम सारथीमार्फत राबविल्या जातात. मात्र गत काळात सारथीच्या अनेक योजना या निधीअभावी बंद झाल्याने सारथी संस्थेचे अनेक उपक्रम व प्रशिक्षणे प्रलंबित राहिले. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथीला बळकटी देण्यासाठी पाऊल उचलले आहे.
--------
कोट
(फोटो घेणे हाफ काॅलम)
अमरावतीत सारथीचे विभागीय केंद्र सुरु करण्याचे मान्य केले. तसेच यासंदर्भात विभागनिहाय कृती आराखडा तयार करावा व जलद कार्यवाही करण्याचे निर्देश देखील ना. पवार यांनी सारथी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे.
-सुलभा खोडके, आमदार