शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

‘ते’ मांस गोवंशाचे निघाले

By admin | Published: April 02, 2016 12:15 AM

नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हैदरपुरा येथून १७ फेब्रुवारी २०१६ रोजी जप्त करण्यात आलेले ७,५०० किलो मांस हे गोवंशाचे असल्याबाबतचा ..

१३ नमुन्यांची तपासणी : विभागीय विज्ञान प्रयोगशाळेचा अहवालअमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हैदरपुरा येथून १७ फेब्रुवारी २०१६ रोजी जप्त करण्यात आलेले ७,५०० किलो मांस हे गोवंशाचे असल्याबाबतचा अहवाल येथील विभागीय विज्ञान प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे आता महापालिका व पोलीस प्रशासनाला आरोपींविरुद्ध गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार कारवाईचा मार्ग सुकर झाला आहे.महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंदे्र यांनी पोलीस बंदोबस्तात ७,५०० किलो मांस ताब्यात घेण्याची कारवाई केली होती. मुस्लिम बहुल भागात गोवंशाची हत्या करुन मांस बाहेरगावी पाठविले जात असल्याची गुप्त माहिती पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापडा रचून एम. एच. ३७ जे ६१३ हे वाहन तपासले असता त्यात प्लास्टिक ड्रममध्ये मांस असल्याचे दिसून आले होते. मात्र हे मांस कोणत्या पशुंचे? हे तपासण्याकरीता पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे धाव घेतली होती. त्यानुसार महापालिकेचे पशू वैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांनी घटनास्थळी पंचनामा करुन मांसाचे १३ नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले होते. उर्वरित मांस हे कम्पोस्ट डेपोत छायाचित्रात पुरविण्याची कार्यवाही करण्यात आली. मात्र सदर मांस हे गोवंशाचे असल्याचा संशय व्यक्त करुन सचिन बोंद्रे यांनी अनधिकृत कत्तल करणे, विनापरवानगी मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी सुधारित गोवंश हत्याबंदी कायदा, प्राणी सुरक्षा अधिनियम, प्राणी कु्र रता अधिनियम अन्वये नागपुरी गेट पोलिसात ००६४/२०१६ नुसार प्राथमिक गुन्हा नोंदविला होता. गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार ठोस कारवाई करण्यापूर्वी हे मांस गोवंशाचे आहे, हे सिद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेचा अहवाल अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने आयुक्त गुडेवारांच्या आदेशानुसार मांसाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. या मांसाच्या नमुन्याचा अहवाल २६ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाला. विभागीय विज्ञान प्रयोगशाळेचे सहायक तज्ज्ञ अधिकारी एम. जी. कांबळे यांनी मांसाचे नमुने हे गोवंशाचे असल्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे. (प्रतिनिधी)अहवालामुळे होणार कारवाई७,५०० किलो मांस जप्त करण्यात आल्यानंतर ते मांस कशाचे? हे शोधून काढण्यासाठी विभागीय विज्ञान प्रयोगशाळेत मांसाचे नमुने तपासणी करीता पाठविले. अखेर अहवाल गोवंशाचे मांस असल्याबाबत स्पष्ट झाला. आता आरोपींना कारवाई करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.मांस ताब्यात घेण्याची कारवाई ही छायाचित्रणात करण्यात आली. मांसाचे नमुने ताब्यात घेवून ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यामुळे गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार कारवाई केली जाईल.- सचिन बोंद्रे, पशु वैद्यकीय अधिकारी, महापालिका.