शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘ते’ आले होते डॉक्टरांना ठगविण्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 10:46 PM

बीएसएनएलच्या मेडिक्लेम पॅनलवर नियुक्तीचे आमिष दाखवून डॉक्टरांची आर्थिक लुबाडणूक करण्याच्या बेतात अमरावतीत आलेल्या आंतरराज्यीय टोळीला शहर पोलिसांनी शनिवारी गजाआड केले. डॉक्टरांवर त्यांनी जाळे टाकले; मात्र डॉक्टर व बीएसएनएल अधिकाऱ्याच्या तल्लख बुद्धीने ही ठगबाज टोळीच त्यात अडकली.

ठळक मुद्देमनसुबे उधळले : बनावट मतदान कार्ड दाखवून शहरात मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बीएसएनएलच्या मेडिक्लेम पॅनलवर नियुक्तीचे आमिष दाखवून डॉक्टरांची आर्थिक लुबाडणूक करण्याच्या बेतात अमरावतीत आलेल्या आंतरराज्यीय टोळीला शहर पोलिसांनी शनिवारी गजाआड केले. डॉक्टरांवर त्यांनी जाळे टाकले; मात्र डॉक्टर व बीएसएनएल अधिकाऱ्याच्या तल्लख बुद्धीने ही ठगबाज टोळीच त्यात अडकली.अमरावतीत शहरातील नामचीन डॉक्टरांची इत्थंभूत माहिती काढण्यासाठी चार ठकबाजांची आतंरराज्यीय टोळी ८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी अमरावतीत दाखल झाली. त्यांनी बनावट इलेक्शन कार्ड दाखवून अंबादेवी रोडवरील आर.के. हॉटेलमध्ये रूम मिळविली. रमेश प्रजापती असे मूळ नाव असलेल्या आरोपीच्या इलेक्शन कार्डवर संजयसिंग राजवीरसिंग, तर मो. सफदर याच्या कार्डवर सुशीलकुमार बलवीर अशी नावे होती. पसार झालेले अजयकुमार नरेशकुमार व अरविंद कुमार किसनलाल यांनीही बनावट इलेक्शन कार्ड वापरल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे. लॉजमधून बाहेर पडल्यानंतर विविध हॉस्पिटलची पाहणी करणे, तेथील कर्मचारी व डॉक्टरांची भेट घेणे, त्यांच्याकडून माहिती काढणे व मोबाइल क्रमांक घेणे असा त्यांचा नित्यक्रम होता. संबंधित डॉक्टरांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क करून व मेडिक्लेमची माहिती देऊन या टोळीने भेटण्याची वेळ निश्चित करण्यास सुरुवात केली होती. १२ आॅक्टोबर रोजी ते बख्तार हॉस्पिटलला गेले. मात्र, डॉ. विजय बख्तार यांना त्यांनी दिलेल्या दस्तावेजांवर संशय आला. त्यांनी बीएसएनएल अधिकाºयांशी केल्याने ठगबाजीचा हा गंभीर प्रकार उघड झाला, अन्यथा या ठगबाजाच्या जाळ्यात डॉक्टर अडकण्याची दाट शक्यता होती.हॉटेलच्या रूमची झडती घेणारआंतरराज्यीय टोळीतील या आरोपींनी राज्यभरात काही डॉक्टरांना फसविले आहे. त्यांनी आता अमरावतीतील डॉक्टरांवर लक्ष केंद्रित केले होते. बनावट मतदान कार्ड दाखवून ते थांबले होते, त्या हॉटेलच्या खोलीतून आरोपींविरुद्ध आणखी पुरावे मिळतील, हे गृहीत धरून झडती होणार आहे.या पोलीस पथकाची कामगिरीपोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर व उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम व राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राम गिते, आशिष देशमुख, पोलीस शिपाई विनोद गाडेकर, विजय पेठे, अजय मिश्रा, नीलेश पाटील, सै. इम्रान, दीपक दुबे, एहजाज शाह, दिनेश नांदे, सुलतान, उमेश कापडे, चालक बैरड तसेच राजापेठचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन मेहेत्रे यांच्या पथकातील वाटाणे, प्रेम रावत यांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली.