असाईनमेंट पान १
फोटो पी १३ भाकरे
अमरावती : शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण अलीकडे वाढतेच आहे. मात्र, मोबाईल जीवनावश्यक वस्तू बनली आहे. अनेक जण दोन ते तीन मोबाईल वापरतात. अलीकडे आकाराने मोठे असलेले मोबाईल वापरणाऱ्यांच्या संख्येत भर पडली आहे. ते मोबाईल ना हातात बसतात, न खिशात मावतात. त्यामुळे की काय, मोबाईल चोरणे चोरांसाठी सोईचे ठरत असल्याची स्थिती आहे.
कोरोनाकाळात शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन क्लास घेतले गेले. घेतले जात आहेत. मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर ऑनलाईन क्लास करणे फारसे शक्य नाही. त्यामुळे टॅबसह अनेकांच्या घरात आकाराने मोठे मोबाईल आले. ते घेऊन पालक बाहेर पडले की, ते धड खिशातही मावत नाही, ना हातात. त्यामुळे चोरांचे आयतेच फावत असल्याचे निरीक्षण आहे.
शहरातील मोबाईल चोरीच्या घटना
२०१९ : १८९१
२०२० : १११३
२०२१ : ५६७
चोरी नव्हे गहाळ म्हणा
१) मोबाईल चोरीची तक्रार घेऊन गेल्यास ती तक्रार ‘गहाळ’ म्हणून नोंदविली जाते.
२) एफआयआरची विनंती केल्यास समुपदेशन केले जाते.
३) गहाळ म्हटल्यास लवकर तपास होईल, असेही सांगितले जाते.
४) सायबर पोलिसांकडे जाण्याचा सल्लादेखील दिला जातो.
/////////////
या भागांमध्ये मोबाईल सांभाळा
१) अंबादेवी यात्रेमध्ये भाविकांची तुफान गर्दी असते. तेथे मोबाईल चोर सक्रिय असतात.
२) स्थानिक इतवारा बाजार, शुक्रवार बाजारात मोठी ग्राहकी असते. तेथेही तुमचा मोबाईल लक्ष्य केला जातो.
३) सायन्स कोअर मैदान, नेहरू मैदानातील गर्दीतही मोबाईल चोर संधी शोधतात.