वनविभागाची कारवाई : परतवाड्यात तीन आरागिरण्यांवर धाडसत्रअमरावती : खुल्या जागेवर अवैध लाकूड साठविणे व त्यानंतर संधी शाधून ते आरागिरणीत वापरणे, हा लाकूड तस्करीचा नवा फंडा आरागिरणी संचालकांनी शोधून काढला आहे. मात्र, याबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच परतवाड्यात वनविभागाने आरागिरण्यांवर धाडसत्र राबविले. तीन ठिकाणी धाडसत्रअमरावती : खुल्या जागेवरील एक घनमीटर कडूनिंब प्रजातीचे अवैध लाकूड जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या आदेशानुसार परतवाड्याचे वनपरिक्षेत्राधिकारी बारखडे यांच्या चमुने तीन आरागिरण्यांवर धाड टाकली. यात अकबर नामक लाकूड व्यापाऱ्याकडून अवैधरीत्या आढळलेले कडूनिंब प्रजातीचे १२ नग लाकूड पंचनामा करून ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र ‘सॉ मिल’च्या पाठीमागे, फिरोज फर्निचरच्या मागील बाजूस तर न्यू मॉडर्न आरागिरणी या तीन ठिकाणी वनविभागाने धाडसत्र राबविले. एकूण १२ नग लाकूड ताब्यात घेतले असून सुमारे एक घनमिटर अवैध लाकूड जप्त करण्यात आले आहे. परतवाड्य़ाचे वर्तुळ अधिकारी बी.आर.झामरे यांचे आरागिरणी मालकांसोबत लागेबांधे असल्यामुळे अवैध लाकूड तस्करीला उधाण आले आहे. आरागिरण्यांमध्ये अवैध लाकूड आणून ते खुल्या जागेवर साठविले जात असताना आरोपी का पकडले जात नाहीत, याकडे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी लक्ष देणे काळाची गरज आहे. परतवाड्यात वनाधिकाऱ्यांनी आरागिरणीत धाडसत्र सुरू केले तेव्हा ‘कृष्णा सॉ मिल’मध्ये धाडसत्र का राबविले नाही, हे देखील महत्त्वाचे आहे. याठिकाणी सुमारे ४५ टन अवैध लाकूड खुल्या जागेवर साठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. वनाधिकाऱ्यांचे आरागिरणी मालकांसोबत हितसंबंध असल्यामुळेच परतवाडा हे अवैध लाकूड कटाईचे माहेरघर ठरूलागले आहे. तीन जागी धाडसत्र राबविले असले तरी ज्या आरागिरणी मालकांसोबत वनािधकाऱ्यांचे लागेबांधे आहेत, अशा आरागिरणीत अवैध लाकूड रफादफा करण्यात मंगळवारी त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आरागिरणीतील धाडसत्रामध्ये वर्तुळ अधिकारी बी.आर.झामरे, वनपाल के.डी.काळे, एन.सी.ठाकरे, जीतू भारती, संजय चौधरी, उईके, वांगे आदी हजर होते. विनापरवाना लाकूड प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२ महाराष्ट्र अधिनियमावली २०१४ चे नियम ३१, ४७ नुसार वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. मध्यप्रदेशातून अवैध लाकडांची तस्करीपरतवाड्यात मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने सागवान आणले जात असल्याची माहिती परतवाड्याचे वनपरिक्षेत्राधिकारी बारखडे यांना देखील आहे. मात्र, सागवान तस्करीबाबत ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा वनविभागाचा कारभार सुरु आहे. परतवाड्यातील आरागिरणीमध्ये अवैधरित्या आणले जाणारे लाकूड खुल्या जागेत साठवून ठेवले जात असताना यातील आरोपी का पकडले जात नाहीत, यातच सारे गुपित दडले आहे.अचलपूरच्या ‘आझाद सॉ-मिल’ला अभय का?अचलपूर येथील आझाद सॉ मिलमध्ये सागवान, आडजातसह अन्य प्रजातींचे शेकडो टन अवैध लाकूड असताना या आरागिरणीची तपासणी करण्याचे धाडस वनाधिकारी दाखवित नाही, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. लाकूड तस्करीत वनाधिकाऱ्यांची हप्ता वसुली सुरु आहे. वनाधिकारी आरागिरणी मालकांच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे चित्र आहे.
‘ते’ अवैध लाकूड जप्त
By admin | Published: February 01, 2017 12:02 AM