शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कारागृहातील सागवान वृक्षांवर चोरट्यांची नजर

By admin | Published: April 12, 2017 12:35 AM

येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अखत्यारीतील सागवान वृक्षांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे.

दिवसा ‘प्लॅनिंग’ रात्री ‘गेम’: प्रशासनाचे दुर्लक्षअमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अखत्यारीतील सागवान वृक्षांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. दिवसा ‘प्लॅनिंग’ रात्री ‘गेम’ अशी शक्कल चोरट्यांकडून लढविली जात आहे. दरदिवसाला चार ते पाच वृक्षांची कत्तल करून लाखोंच्या संपदेची चोरी होत असताना याकडे कारागृह प्रशासनाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.कारागृहाच्या मागील बाजूस नागपूर राष्ट्रीय महामार्ग वळण रस्ता निर्मितीमुळे सागवानाची शेकडो झाडे विभागली गेली. कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्हअमरावती : यात स्थानिक दंत महाविद्यालय मार्गालगत कारागृहाच्या मालकीचे शेकडो सागवान वृक्ष आहेत. मात्र, ही झाडे बेवारस असल्याने चोरट्यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. लाखोंचे सागवान बेवारस ठेवणाऱ्या कारागृह प्रशासनाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सागवानाच्या जंगलात दिवसा दारूच्या पार्ट्या आणि रात्री गैरप्रकार होत असल्याचे येथे आढळून आलेल्या साहित्यावरून दिसून येते. यापूर्वीचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी सागवान वृक्षाच्या संरक्षणासाठी २४ तास सुरक्षा रक्षक तैनात केले होते. इतकेच नव्हे, तर परिसरात तात्पुरती झोपडीदेखील उभारण्यात आली होती. मात्र, जाधव यांची बदली होताच सागवान वृक्ष बेवारस पडून आहेत. परिसरात किती सागवान वृक्ष आहेत, याची नोंद कारागृह प्रशासनाकडे नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारागृह प्रशासन स्वत:च्या संपदेचे संरक्षण करू शकत नसेल तर कैद्यांवर वॉच कसा ठेवणार, असा सवाल या निमित्ताने पुढे आला आहे.राष्ट्रीय महामार्गावरील वळण धोक्याचेकारागृहाच्या मागील बाजूने गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा वळण रस्ता भविष्यात कारागृहाच्या अंतर्गत व बाह्यसुरक्षेसाठी अतिशय धोकादायक ठरणारा आहे. वळणमार्गावरून कारागृहाच्या आतील हालचाली टिपता येतात. हल्ली कारागृहात नक्षलवादी, मुंबई बॉम्बस्फोट, दाऊदचे समर्थक आदी प्रसिद्ध खून खटल्यातील आरोपी येथील कारागृहात जेरबंद आहेत. त्यामुळे हा वळण मार्ग धोकादायक ठरू शकतो. त्यादृष्टीने कारागृह प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)कारागृहाच्या मालकीच्या सागवान वृक्षांची चोरी होत असेल तर ही गंभीर बाब आहे. सागवान वृक्षांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांची मदत घेऊ.- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती.