आॅनलाईन लोकमतचांदूररेल्वे : संतांचे विचार हे केवळ एक पिढी घडविण्यासाठी नव्हे, तर मानवकल्याणासाठी प्रेरक आहे. माणूस घडविण्यात संतांचा मोठा वाटा आहे. मी विरोधी पक्षात असताना महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांना संतांचे नावे द्यावे, अशी भूमिका घेतली होती. आजही माझी भूमिका कायम आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी येथे केले.ते चांदूररेल्वे तालुक्यातील श्रीक्षेत्र बागापूर खप्ती महाराजांच्या आश्रमातील भक्तनिवासाचे भूमिपूजन करताना व्यक्त केले. याप्रसंगी पालकमंत्री प्रवीण पोटे, अर्थ नियोजन राज्यमंत्री दीपक केसकर, आ.वीरेंद्र जगताप, माजी आमदार अरुण अडसड, भाजपचे तालुकाध्यक्ष पप्पू गुल्हाने, बाजार समितीचे उपसभापती अशोकराव चौधरी, सरपंच विवेक चौधरी, बागापूर आश्रमाचे कार्यवाहक आप्पाजी चौधरी, अविनाश नाफडे, उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक नरेंद्र मोरे व मामीडवार यांनी करून आश्रमातील समस्या विशद केल्या. भक्तनिवासाच्या भूमिपूजनानंतर आश्रमातील गोशाळांची व विविध कामांची माहिती ना. मुनगंटीवार यांनी जाणून घेतली.सुधीर मुनगंटीवार हे बागापूरच्या आश्रमासाठी विशेष कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने बागापूर येथे आगमन झाले. त्यावेळी अरुण अडसड यांनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी विभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत राऊत, पोलीस निरीक्षक ब्रम्हा शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी स्नेहल कनिचे, तहसीलदार बी.ए. राजगडकर सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून होते. मागापूर येथे हेलिकॉप्टर आल्यामुळे आसपासच्या लोकांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. कार्यक्रमाचे आभार सरपंच विवेक चौधरी यांनी मानले.
संतांचे विचार युग, धर्मासाठी प्रेरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:36 PM
संतांचे विचार हे केवळ एक पिढी घडविण्यासाठी नव्हे, तर मानवकल्याणासाठी प्रेरक आहे. माणूस घडविण्यात संतांचा मोठा वाटा आहे.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : खप्ती महाराज संस्थानला भेट