शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

तिसरा दिवसही रांगांचाच !

By admin | Published: November 13, 2016 12:05 AM

एटीएमचे शटर अर्ध्यावर : शनिवारी ३०० कोटींची उलाढाल, पाचशे-हजाराच्या नोटा बदलविण्याची लगबग

अमरावती : पाचशे आणि हजार रुपयांचे चलन रद्द झाल्याच्या पार्श्वभूमिवर शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी बँक आणि एटीएमबाहेर रांगा दिसून आल्यात. रोजच्या व्यवहारात निर्माण झालेल्या अडचणी आणि अनामिक भीती अशा मानसिकतेत बहुतांश नागरिकांनी शनिवारी सकाळपासूनच पाचशे व हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकामध्ये धाव घेतली. परिणामी शहर आणि जिल्ह्यात सर्वदूर बँका बाहेर दिवसभर लांबच लांब रांग राहिली. नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला. शनिवारी जिल्ह्यातील बँक व पोस्ट आॅफिसमध्ये सुमारे ३०० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती अग्रणी बँकेच्या सुत्रांनी दिली आहे.मंगळवारी मध्यरात्रीपासून पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द ठरविण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी देशभरातील बँका बंद राहिल्या. बुधवारी सारे आर्थिक व्यवहार कोलमडले. सर्वदूर ‘पैसा झाला खोटा’ अशी प्रचिती आली. पेट्रोल असो वा सराफा पाचशे-हजारांच्या नोटा चालवण्यासाठी गर्दी झाली. साध्या जेवणासाठीही लोकांना पाचशेची चिल्लर घेण्यासाठी मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. गुरुवारी बँका उघडल्या खऱ्या मात्र उत्सुकतेपोटी रांगाच रांगा लागल्या. इतक्या की पोलिसांना पाचारण करावे लागले. जिल्हा आणि बँक प्रशासनाला शांततेचे आवाहन करावे लागले. शुक्रवारचा तिसरा दिवसही चलनकल्लोळ माजला. शनिवारी बँका नेहमीप्रमाणे बंद राहणाऱ्या होत्या. मात्र बुधवारची सुटी घेतल्याने शनिवारी बँकांचे कामकाज नियमित करण्यात आले. प्रारंभीच्या दोन-तीन तासांमध्ये बहुतेकांना कमाल चार हजारांपर्यंत पैसे बदलून मिळाले. सुरुवातीचे काही ग्राहक दोन हजारांच्या नव्या करकरीत नोटा मिळाल्याने सुदैवी ठरले. शनिवारीही ग्राहकांनी बँकाबाहेर पहाटे सहापासून रांग लावली. (प्रतिनिधी)संभ्रम कायमनोट बदलून कशा मिळणार, किती मिळणार, कमाल किती रक्कम मिळणार, बँकेत खाते हवेच, पैसे किती जमा करता येईल, विड्रॉल करता येईल का? ५००-१००० नोटा बदलायच्या नाहीत. मात्र विड्रॉल करून १०० किंवा ५० च्या नोटा हव्या आहेत, असे अनेक प्रश्न ग्राहकांना पडले होते. त्याचे निरसन करता बँक अधिकाऱ्यांचीही भंबेरी उडाल्याचे चित्र शनिवारी दिसून आले.