लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटातील खडकाळ जमिनीत इच्छाशक्तीच्या आधारावर ३० वर्षात नावीन्यपूर्ण प्रयोग करून दोन हेक्टरमध्ये पंधरा विविध प्रकारचे पीक घेण्याचा बहुमान तालुक्यातील तेलगाव येथील बापुराव ठाकरे या तिसरी पास आदिवासी शेतकºयाने पटकावला आहे. बुधवारी कृषी दिनाचे औचित्य साधून बांधावर जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आलायावेळी चिखदरा पंचायत समितीचे सभापती बन्सी जामकर, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दयाराम काळे, तालुका कृषी अधिकारी विजय पठाडे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राम देशमुख, विस्ताराधिकारी शालिनी वानखडे, बंडू घुगे उपस्थित होते.बाबूराव ठाकरे हे त्यांच्या दोन हेक्टर जमिनीत कुटकी, उडीद, धान, सोयाबीन, ज्वारी, तूर, गहू , हरभरा, मसुर, वाटाना, मिरची, कापूस, कांदा विविध पिके ते घेतात. तर संत्रा, पेरू, आंबा या फळ पिकांची लागवड त्यांनी केली आहे. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसायासोबत ते शेतीअवजारे भाड्याने देऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयोग करतात. यासाठी त्यांची पत्नी भुलाई ठाकरे आणि मुलांचा सुद्धा सहभाग आहे. त्यांचा प्रयोग येथेच थांबत नाही. तर रोपवाटिका, गांडूळ खत कंपोस्ट खत असे प्रकल्प ते चालवितात. तिसरी पास असलेले बापूराव यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले आहे. स्वत:चे स्वस्थ आणि आनंदी जीवन जगत आहेत.मेळघाटात नाविन्यपूर्ण आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून बाबूराव ठाकरे यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. ते शेतीत नवनविन प्रयोग करत असतात.- दयाराम काळेसभापती, समाज कल्याण, जि. प.आदिवासी समाजामध्ये अज्ञान अंधश्रद्धा असले तरी प्रयोगशील शेतकरी समाजासाठी भूषण आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून अशा प्रयोगाची दखल घेण्यात आली.- बन्सी जामकरसभापती, पं. स. चिखलदरा
तिसरी पास बापूराव घेतात १५ प्रकारची पिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 5:00 AM
बाबूराव ठाकरे हे त्यांच्या दोन हेक्टर जमिनीत कुटकी, उडीद, धान, सोयाबीन, ज्वारी, तूर, गहू , हरभरा, मसुर, वाटाना, मिरची, कापूस, कांदा विविध पिके ते घेतात. तर संत्रा, पेरू, आंबा या फळ पिकांची लागवड त्यांनी केली आहे. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसायासोबत ते शेतीअवजारे भाड्याने देऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयोग करतात. यासाठी त्यांची पत्नी भुलाई ठाकरे आणि मुलांचा सुद्धा सहभाग आहे.
ठळक मुद्देबांधावर सत्कार : कृषि विभागाकडून दखल, पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती