ऑनलाईन लोकमतटाकरखेडा संभू : जागतिक स्तरावर पाणीप्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ड्रिप इरिगेशनवर भर दिला पाहिजे. जगात तिसरे महायुद्घ झाले, तर ते पाण्यासाठी होईल. यामुळे पाणी धोरणाला निश्चित दिशा देण्यासाठी सर्व स्तरावरील लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत जलतज्ज्ञ सुधीर भोंगळे यांनी म्हैसपूर येथे व्यक्त केले.भातकुली तालुक्यातील म्हैसपूर येथे शिवजयंतीनिनित्त पाणी परिषद घेण्यात आली, यावेळी सुधीर भोंगळे हे प्रमुख वक्ते होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे होते. श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर चिखले, जि.प. सदस्य प्रकाश साबळे, सुनील डिके, बाजार समितीचे संचालक विकास इंगोले, प्रमोद इंगोले, अंबाडेकर, भैयासाहेब निचळ तसेच खारपाणपट्ट्यातील ५० गावांतील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. प्रकाश साबळे यांनीही मार्गदर्शन केले. यानिमित्त गरीब व गरजू शेतकरी, शेतमजूर महिलांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी विश्वंभर मार्के, अवि पाटील ढोके, रवि बुरघाटे, दत्ता गावंडे, ऐनुल्ला खान, राहुल तायडे, समीर जवंजाळ, पंकज देशमुख, गोपाल महल्ले, सुनील भगत, उमेश वाकोडे, गोपाल महल्ले, डिगांबर गाळे, अनिकेत जावरकर, अंकुश जुनघरे, आशुतोष देशमुख, ज्ञानेश्वर काळे, विनोद जायवाल आदी ग्रामस्त मंडळी आदी उपस्थित होते.
तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:11 AM
जागतिक स्तरावर पाणीप्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ड्रिप इरिगेशनवर भर दिला पाहिजे. जगात तिसरे महायुद्घ झाले, तर ते पाण्यासाठी होईल.
ठळक मुद्देसुधीर भोंगळे : शिवजयंतीनिमित्त म्हैसपूर येथे पाणी परिषद