लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निकालदर्शक अभिलेखाद्वारे विभागीय आयुक्तांनी केलेल्या मूल्यांकनात अमरावती जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) चे सर्वाधिक योगदान लाभल्याची प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.विभागांतर्गत येणाऱ्या पाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कामकाजाच्या मूल्यमापनाकरिता गुगल ड्राईव्हवर ‘स्प्रेडशिट’ तयार करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील योजनांचे उद्दिष्ट व साध्य याविषयी अचूक माहिती आॅनलाईन भरण्याबाबत सर्व सीईओंना सूचित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावर आॅनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे गुणानुक्रम ठरविण्यात आले. त्यामध्ये अमरावती जिल्हा परिषदेला ६५.८० टक्के गुण मिळालेत. विभाग प्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांच्या विकास कामाबाबत नियमित बैठका घेणे, सोपविलेल्या कामाबाबत त्यांचा पाठपुरावा, कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणे यासोबतच अधिकारी-कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड आणि संगणकीकृत नस्ती व पत्रव्यवहार अनिवार्य करणे आदी निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजाला गती आली आहे. मार्च महिन्यात झालेल्या मूल्यांकनात जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक मिळविल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.सर्व विभागाचे सहकार्यजिल्हा परिषदेचा पदभार स्वीकारल्यापासून मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी गतिमान कार्यपद्धतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांना सर्व विभागप्रमुखांचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेला तृतीय क्रमांक मिळाला असल्याचे सुत्रांनी सांगितले.
जिल्हा परिषद विभागात ठरली तिसरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 11:22 PM
निकालदर्शक अभिलेखाद्वारे विभागीय आयुक्तांनी केलेल्या मूल्यांकनात अमरावती जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) चे सर्वाधिक योगदान लाभल्याची प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.
ठळक मुद्देमूल्यांकन : स्वच्छ भारत अभियान