शहरं
Join us  
Trending Stories
1
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
2
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
3
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
4
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
5
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
6
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
7
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
9
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
10
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
11
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
12
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
13
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
14
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
15
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
16
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
18
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
19
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
20
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार

पावसाळ्याच्या दिवसात ११ गावांची तहान टँकरवर टंचाई कायम

By जितेंद्र दखने | Published: July 06, 2023 6:55 PM

: ७८ गावांमध्ये ८६ विहिरींचे अधिग्रहण

अमरावती : यावर्षी जून संपून जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरीही सार्वत्रिक चांगला पाऊस बरसलेला नाही. परिणामी पेरण्या खोळंबल्या असून, जिल्ह्यातील पाणीटंचाईचे ढगही कायम आहेत. अद्यापही जिल्ह्यातील ११ गावांत पावसाळ्याच्या दिवसात टँकरद्वारेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

याशिवाय ७८ गावांतही पाणीटंचाईची समस्या कायम असल्याने या ठिकाणी ८६ विहिरींचे अधिग्रहण केलेले आहे. त्यामुळे टंचाईची मुदत संपत असताना पुरेसा पाऊस न झाल्याने टॅंकर आणि विहीर अधिग्रहणाला वाढीव कालावधीत पाणी पुरवठ्यासाठी कंत्राटदाराला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वाढीव निधी मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागाला उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची झळ सोसावी लागू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या ७६६ गावांत पाणी पुरवठ्याच्या विविध ८०० उपाययोजनांचे नियोजन करून एकूण १२.४४ कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली. टंचाई आराखडयानुसार उपाययोजना केल्या. मात्र, आता टंचाईचा कालावधी संपुष्टात आला असतानाही जिल्ह्यात पाणीटंचाईचे ढग तूर्तास कायम आहेत. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील नागरिकांची तहान टॅंकर व विहीर अधिग्रहणाच्या माध्यमातून भागविली जात आहे. त्यामुळे टंचाईची समस्या अजून किती दिवस कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या गावात होतोय टॅंकरने पाणी पुरवठा

चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरामधील आकी, मोथा, खोंगडा, रायपूर, साेमवारखेडा, बगदरी, धरमडोह, खडीमल, एकझिरा, गौलखेडा बाजार या गावांचा समावेश आहे.पाणीटंचाई आराखडयाची मुदत ३० जून रोजी संपली आहे. मात्र, ग्रामीण भागातील काही गावांत अजूनही पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झालेले नाही. सध्या पावसाळयाचे दिवस आहेत. मात्र, नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी मुदतीनंतर पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. शासनाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविला आहे.

- संदीप देशमुख कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद