लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : फुटपाथवर व्यवसाय थाटणाºया पानटपरीचालकाने महापालिका अधिकाºयांना जिवे मारण्याची धमकी दिली. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासमोरील रस्त्यालगत असणाºया फुटपाथचे अतिक्रमण हटविताना हा प्रकार घडला. यासंदर्भात अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे पोलीस संरक्षणात त्यांच्या पथकासह बुधवारी अतिक्रमण हटविण्याच्या कर्तव्यावर होते. त्यांनी प्रथम मालटेकडी रोडवर फुटपाथवरील हातगाड्यांचे साहित्य जप्त केले. त्यानंतर ते न्यायालयासमोरील फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पोहोचले. जिल्हा परिषदेसमोरील फुटपाथवर पानटपºयांचे साहित्य जप्त करीत असताना सायंकाळी चारच्या सुमारास तेथील पानटपरीचालक गोपाल चव्हाण (३५, देविनगर) याने कुत्तरमारेंशी वाद घातला व कर्मचाºयांना साहित्य जप्त करण्यास मज्जाव केला. पोलिसांनीही न जुमानता, त्याने ‘मी दोनशे लोक जमवून तुम्हाला मारून टाकेन, खोटी तक्रार करून फसवेन’, अशी धमकी कुत्तरमारेंना दिली. यावेळी पोलीस पथकातील सवाई, प्रीतम वानखडे, जयंत वाढोवे, मजहर, आडे हे उपस्थित होते. चव्हाण याने साहित्य जप्त करण्यास मज्जाव केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे कुत्तरमारे यांनी थेट गाडगेनगर ठाणे गाठून गोपाल चव्हाणविरुद्ध तक्रार नोंदविली.गाडगेनगर पोलिसांनी गोपाल चव्हाणविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, ३४१, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.महापालिका अधिकाºयांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू केली आहे.- दत्ता देसाई, सहायक पोलीस निरीक्षक, गाडगेनगर.
अतिक्रमणधारकाची महापालिका अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 10:34 PM
फुटपाथवर व्यवसाय थाटणाºया पानटपरीचालकाने महापालिका अधिकाºयांना जिवे मारण्याची धमकी दिली. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासमोरील रस्त्यालगत असणाºया फुटपाथचे अतिक्रमण हटविताना हा प्रकार घडला. यासंदर्भात अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषदेसमोरील प्रकार : गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल