शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
5
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
6
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
7
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
8
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
9
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
10
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
11
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
12
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
13
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
14
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
15
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
16
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
17
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
18
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
19
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
20
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या प्रमुखाला चाकू मारण्याची धमकी

By admin | Published: September 10, 2015 12:05 AM

राजापेठ पोलीस ठाण्यानजीकच्या महापालिका गोदाम परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांना बुधवारी सकाळी एका अतिक्रमणधारकाने चाकू मारण्याची धमकी दिली.

अतिक्रमणधारकांची मुजोरी : राजापेठ परिसरात सुरु होती कारवाई अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यानजीकच्या महापालिका गोदाम परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांना बुधवारी सकाळी एका अतिक्रमणधारकाने चाकू मारण्याची धमकी दिली. राजापेठ परिसरातील अतिक्रमणातील हातगाड्यांवर कारवाई केल्यानंतर एका अतिक्रमणधारकाने हा प्रकार केला. काही दिवसांपूर्वीच रेल्वे स्थानक परिसरात अतिक्रमण हटविताना महापालिकेच्या कर्मचाऱ्याला चाकू मारण्यात आला. हा वाद शांत होत नाही तोच अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनाच थेट चाकू मारण्याची धमकी अतिक्रमणधारकाने दिली आहे. पोलीस संरक्षणात अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, तरीही मोहिमेला प्रचंड विरोध होत असल्याचे चित्र आहे. बुधवारी गणेश कुत्तरमारे यांनी राजापेठ परिसरातील अतिक्रमण हटविणे सुरु केले. यावेळी त्यांनी काही हातगाड्या जप्त केल्या. त्या हातगाड्या राजापेठ पोलीस ठाण्याच्या बाजुला असणाऱ्या महापालिका गोदामात ठेवण्यात येत होत्या. याच दरम्यान आरोपी मोहम्मद सोहेब मोहम्मद हुसेन(२०,रा. भाजीबाजार),शेख निसार शेख मेहबूब (२५,रा. हैदरपुरा), जमीर भाई नासिर भाई (२७,रा कलीमनगर) व शेख निसार शेख फारूख (२१,रा. अकबरनगर) यांनी कुत्तरमारे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून 'तुमको चाकुसे मारना पडेगा' अशी धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. कुत्तरमारे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पोलिसांनी भादंविच्या कलम ३५३, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून मा. सोहेब मो. हुसेन व शेख निसार शेख मेहबूब यांना अटक केली तर दोन आरोपी पसार झाले. (प्रतिनिधी)शहरात अतिक्रमण हटाव मोहीममहापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशाने बुधवारी शहरातील जवाहर गेट ते ईस्माइल कटपीस, परकोटा शेजारील व रेल्वे स्थानक चौक परिसरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये ३५ हातगाड्या, २ पानटपऱ्या व गाड्या चढविण्याचे हायड्रोलिक स्टॅन्ड जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत ७ ट्रक माल महापालिकेने जप्त केला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक खराते, उमेश सवई, पोलीस कर्मचारी व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.