--------------------
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
मोर्शी : शहरातील एका ट्युशन क्लासमधून १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार पालकांनी मोर्शी पोलिस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सय्यद इसाक शेख सईद (२४, रा. गिट्टीखदान, मोर्शी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------
खोलापुरात क्षुल्लक कारणावरून शेतमजुराला मारहाण
खल्लार : खोलापूर येथील मातंगपुऱ्यात ४० वर्षीय शेतमजुराला प्रकाश किसन माहुरे, घणा किसन माहुरे व शंकरराव झीमराजी माहुरे या तिघांनी रोजगार हमी योजना पेटीविषयी किसनरावला का विचारले, असे म्हणत मारहाण केली. चाकूने वार करण्याची धमकीही दिली. खोलापूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------
असदपूर येथून ऐवज लंपास
आसेगाव पूर्णा : असदपूर येथील जुन्या घराच्या दुरुस्तीकरिता मे महिन्यात तेथे गेलेल्या महेंद्र विष्णू भगत (रा. छत्रसालनगर, अमरावती) यांनी काही ऐवज तेथे ठेवला होता. यादरम्यान कोविडवरील उपचार घेण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी त्यांनी गावाकडील घर गाठले असता मोबाईल, रोख रक्कम व इतर साहित्य असा ११,८०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांनी अासेगाव पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
----------------------
शंभर रुपयांसाठी सळाखीने मारहाण
मोर्शी : तालुक्यातील गणेशपूर येथे उधार घेतलेले शंभर रुपये मागितल्याने मनित चिंटू युवनाते (३३, रा. पिंपरी याने देवराव भीमराव लोखंडे (३२, रा. गणेशपूर) यांच्या वडिलांना लोखंडी सळाखीने मारून जखमी केले. मोर्शी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.