अमरावती : जुन्या वादातून युवकावर देशी कट्टयातून जीवघेण्याच्या उद्देशाने गोळी झाडून चाकूने हल्ला चढविल्याची घटना गाडगेनगर ठाणे अलअजीज हाॅलनजीकच्या नवसारी मार्गानजीक १७ फेब्रुवारी रात्री १०.३० वाजतच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी आतापर्यंत तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. जखमींच्या छातीतून शस्रक्रीया करून नागपूर येथील खासगी हॉस्पिटमध्ये एका गोळी काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोसीम ऊर्फ राजा खान वल्द मोसीन खान (३७ रा. जमजमनगर), मोहम्मद आदी ऊर्फ अखतर इकबाल हुसेन (४०, रा. वहीदनगर), अब्दुल वहीद अब्दुल रशीद (३५) रा. गुलीस्तानगर तसेच अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहे.
फिरोज खान ऊर्फ लच्छू वल्द अफोज खान (३०, रा. हबीबनगर) असे जखमीचे नाव आहे. त्याला प्रथम इर्विन रुग्णालयात नंतर प्रकृती गंभीर असल्याने नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात शस्रक्रिया करून छातीतून एक गोळी बाहेर काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले करीत आहेत.
बॉक्स:
घटनास्थळाहून चार कार्टेज जप्त
गोळीबारानंतर पोलिसांना घटनास्थळावर चार कार्टेज आढळून आल्या. बंदुकीतून पाच गोळ्या झाडल्या असाव्या. त्यातील एक गोळी युवकाच्या छातीत शिरली. गोळी झाडल्यानंतर त्या कार्टेज पोलिसांना आढळून आल्या. जीवे मारण्याच्या उद्देशाने देशी कट्ट्यातून युवकावर गोळ्या झाडल्या असाव्या, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले.