शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:12 PM

गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

ठळक मुद्देचार प्रकल्पांचे दरवाजे उघडले पाण्याचा विसर्ग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारा अप्पर वर्धा धरण गेल्या आठवड्यातच शंभर टक्के भरले होते. पूर्वी धरणाचे तीन दरवाजे उघड्यात आले होते. आता मंगळवारपासून १० सेंमीने पाच दरवाजे उघडण्यात आले असून, वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाचा मानला जाणारा बेंबळा हा मोठा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. या प्रकल्पाचे १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पसुद्धा शंभर टक्के भरला असून, १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पात ९८.२३ टक्के पाणीसाठा साचल्यामुळे १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या पाणीसाठ्याच्या नोंदीनुसार चार प्रकल्पांचे गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सुद्धा सतर्क करण्यात आले आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ४५.०३ टक्के पाणीसाठा साचला आहे. अरुणावती प्रकल्पात सर्वात कमी १३.३४ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यतील काटेपूर्णा प्रकल्पात फक्त २४.३० टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात मागील वर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. पेनटाकळी प्रकल्पात चांगला पाणीसाठा साचला असला तरी नळगंगा प्रकल्पात ३८.४९ टक्के पाणीसाठा आहे. खडकपूर्णा प्रकल्प शुन्य टक्यांवरून आता ५.१६ टक्क्यांवर गेला आहे. एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ७१.८२ टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ७०.१९ टक्के पाणीसाठा आहे. ४६९ प्रकल्पांत सरासरी ४९.९५ टक्के पाणीसठा साचला असून मध्यम, मोठे व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६३.९१ टक्के पाणीसाठा साचला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.पाच मध्यम प्रकल्प शंभर टक्केयंदा पाच मध्यम प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा साचला आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, नवरगांव, बुलडाणा जिल्ह्यतील ज्ञानगंगा, मस, पलढग प्रकल्पांचा समावेश आहे, तर अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत ९५.७४ टक्के पाणीसाठा आहे. पाच सेंमीने चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. चंद्रभागा प्रकल्पात ९५.४७ टक्के पाणीसाठा असून, १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले. पूर्णा ९१.८९ टक्के १५ सेमींने दोन दरवाजे उघडले आहेत. सपन प्रकल्पात ९६.२७ टक्के पाच सेंमीने चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यवतमाळमधील बोरंगाव ९७.४३ टक्के, बुलडाणामधील तोरणा ९८.१० टक्के सदर प्रकल्प शंभर टक्याच्या वाटेवर आहेत.

टॅग्स :Waterपाणी