शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

हल्लेखोरांच्या तीन दुचाकी जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 11:58 PM

भीमा कोरेगाव प्रकरणाच्या अनुषंगाने अमरावतीत व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला.

ठळक मुद्देजवाहर गेट परिसरातील घटनाव्यापारी, हिंदुत्ववादी संघटनांची एकीदुकाने बंद तरीही दगडफेकदुचाकी सोडून पळाले ‘ते’ युवक

आॅनलाईन लोकमतअमरावती : भीमा कोरेगाव प्रकरणाच्या अनुषंगाने अमरावतीत व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला. मात्र, काही युवकांनी बंद प्रतिष्ठानांवरही दगडफेक करून व्यापाऱ्यांना मारहाण केली. व्यापाऱ्यांचा रोष त्यामुळे उफाळून आला. व्यापारी एकत्र आले आणि त्या युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला. युवक पळाले, मात्र त्यांच्या तीन दुचाकी हाती लागल्या. त्या जाळण्यात आल्या. या घटनेने खळबळ उडाली होती.शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. मात्र, बुधवारी सकाळपासून पडसाद उमटू लागले. शहरातील विविध परिसरातून एकत्रित होताना काही युवकांनी दुचाकींवरून शहरातील विविध व्यापारी परिसरात उच्छाद घातला. जोरदार नारेबाजी करीत प्रतिष्ठानांवर दगडफेक केली. या दगडफेकीचे सर्वाधिक पडसाद जवाहर गेटच्या आत पाहायला मिळाले. सात ते आठ युवक दुचाकीने जवाहर गेट ते सराफा बाजार मार्गावरील व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्यासाठी गेले. त्यांनी आरडाओरड व नारेबाजी करून थेट व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक सुरू केली. दुग्ध व्यावसायिक पूनमचंद हलवाई यांची दुधाची भट्टी फोडली. वर्मा स्टिल हे प्रतिष्ठान कुलूपबंद न दिसल्याने बाहेर बसलेले दुकानमालक रामू वर्मा यांना मारहाण केली. कैलास शर्मा व गोलू नामक कर्मचाºयालासुद्धा त्यांनी मारहाण केली. त्यांच्यातील एकाने तर चक्क चाकू बाहेर काढून व्यापाऱ्यांना धाक दाखविला. या दहशतीमुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली. दुकाने लुटली जाऊ नयेत, या विचारातून सर्व व्यापारी भीती बाजूला सारून एकत्र आले. त्या युवकांचा जत्था जसजसा समोर येऊ लागला, तसतसे व्यापारीसुद्धा एकत्रित होत गेले. एकीकडे सात ते आठ युवक, तर दुसरीकडे पन्नासेक व्यापारी एकत्र आले आणि त्या युवकांवर धावा बोलला. व्यापारी समोर येत असल्याचे पाहून ते युवक घाबरले. उलटपावली पळून गेले. व्यापाºयांनी प्रयत्न करूनही त्या युवकांना पकडण्यात यश आले नाही. मात्र, तिघांना त्यांच्या दुचाकी सोबत नेता आल्या नाहीत. व्यापाऱ्यांनी सारा रोष दुचाकींवर व्यक्त केला. ठरवून त्या जाळल्या. काही हिंदुत्ववादी संघटना व्यापाºयांच्या मदतीला धावून आल्या. ते युुवक पुन्हा आल्यास सामना करण्याच्या तयारीत सर्वजण होते.निघाले नाही मोबाइल : दोन दुचाकी गेटच्या समोर आणि एक दुचाकी गेटच्या आत जाळण्यात आली. विशेष असे, ही जाळपोळ करताना कुणीही छायाचित्रण करू नये, अशी विनंती करण्यात आली. भरगच्च गर्दीत एकाही मोबाइलमध्ये दुचाकी कुणी जाळल्या, हे कैद झाले नाही.जवाहर गेट परिसरात जमावबंदी लागूहल्लेखोर युवकांच्या ज्या दुचाकी व्यापाऱ्यांनी जाळल्या, त्यांचे क्रमांक असे आहेत - एमएच २७ बीसी-८५५६, एमएच २७-बीजी-१८२७ व एमएच २७ बीए-१८२७. दरम्यान, जवाहरगेट आणि सक्करसाथ परिसरात हिंदुत्ववाद्यांची आणि व्यापाºयांची गर्दी वाढू लागल्याने लाठीचार्ज करण्याचे आदेश पोलिसांना वरिष्ठ अधिकाºयांकडून प्राप्त झाले होते. दरम्यान, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी जातीने मोर्चा सांभाळला. जवाहर गेटवर बॅरिगेड्स लावून ते स्वत: उपस्थित होते. त्यांनी जमावबंदीचे कलम १४४ लागू केले. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन घरी जाण्याची विनंती त्यांनी केली. ते युवक पुन्हा गेटच्या आत शिरू देणार नाही, अशी हमी त्यांनी घेतल्यावर हळूहळू जमाव पांगू लागला.