परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत बोरगाव पेठ येथे दोन दिवसांत तिघांचा मृत्यू झाला. एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आहे, तर एक इसम आणि अन्य एका महिलेचा मृत्यू कशाने झाला, याबाबत प्रशासन माहिती घेत आहे. दुसरीकडे गावातील चौकांत नागरिक कोरोना नियमांचे पालन न करता अकारण घोळक्याने बसत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.
बोरगाव पेठ या हजार ते पंधराशे लोकसंख्येच्या गावात दोन दिवसांत तिघे दगावले. यात अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महिलेचा मृत्यू झाला. कोरोनामुक्त पुरुषाचा मंगळवारी, तर बुधवारी एका महिलेचा मृत्यू झाला. नागरिक बिनधास्त फिरत असल्याचे चित्र आहे.
बॉक्स
सचिव सहकुटुंब संक्रमित
नागरिकांना नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासन यंत्रणा रात्रंदिवस रस्त्यावर आहे. अनेकांच्या संपर्कात येत असताना तेही संक्रमित होत आहेत. हाच प्रकार
बोरगाव पेठ येथील ग्रामसेवकासोबत झाला. संक्रमणाची बाधा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला झाली. आता मुलगी व पत्नीची प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
बोरगाव पेठ येथील बाधितांची आकडेवारी घेतला जात आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल.
- महादेव कासदेकर, विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती, अचलपूर