मनीष कहाते।आॅनलाईन लोकमतअमरावती : ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, घनकचरा प्रदूषण आणि जलप्रदूषण आदींपासून प्रदूषणाची वाढ होत आहे. शहरात सर्वाधिक प्रदूषण वायूमुळे होतो. वायुप्रदूषण मोजण्यासाठी शहरात केवळ तीन यंत्रे लावण्यात आली आहेत. यंत्र केवळ एक किलोमीटरच्या परिसरातील वायुप्रदूषणाची मोजदाद करते. त्यामुळे जिथे यंत्र नाही, त्या परिसरातील जनतेच्या आरोग्याचे काय, असा प्रश्न निमार्ण झाला आहे.शहरात महापालिका इमारत, शासकीय इंजिनीअरिंग कॉलेज आणि एम.आय.डी.सी. परिसरात वायुप्रदूषण मोजणारे यंत्र सहा वर्षांपूर्वी बसविण्यात आले. ती यंत्रे आठवड्यातून दोनच दिवस सुरू राहतात. १०० एम.क्यू. मिलीग्रॅम प्रदूषण म्हणजे साधारण असते. वर्षभरात वायुप्रदूषण १०० एम.क्यू. मिलिग्रॅम पेक्षा वर गेले आहे. यंत्र आणि त्याचे त्याचे मोजमाप महाराष्टÑ राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ करते. प्रदूषणात वाढ झाली असल्यास मंडळ महानगरपालिकेला कळविते. त्यावर महानगरपालिका उपाययोजना करते, अशी एकंदर प्रक्रिया आहे. शहरात सर्वाधिक वाहनामुळे प्रदूषण होत आहे परंतु त्यावर उपाय होताना दिसत नाही. सर्वच यंत्रे भंगार झाली आहेत.घनकचरा प्रदूषणामुळे सल्फर डायआॅक्साइड, मिथेन, अमोनिया, कार्बन मोनाआॅक्साईड इत्यादी वायू आपोआप तयार होतात. त्यामुळे प्रदूषण वाढते. याची मोजमाप दर महिन्यातून फक्त एकदा होते. यंत्र घनकचºयाच्या ढिगाºयाजवळ काही तास ठेवले जातात. 'सल्फर डायआॅक्साइड ५०० सस्पेंडेड पर्टिक्यूलेट मॅटर' असे त्याचे मापन आहे. ५०० म्हणजे सर्वसाधारण आहे. परंतु, त्यापेक्षा वर आहे. मिथेन वायू ६५० एम. जी. परमीटर सर्वसाधारण पाहिजे. पण, तेही वर आहे. त्यामुळे घनकचऱ्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त प्रदूषण मोजते. परंतु कारवाईचे अधिकार त्यांच्याकडे नाही.जल प्रदूषण शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. सांडपाण्याची नदी, छोट्या-मोठ्या नाल्या यामध्ये प्रचंड प्रमाणात कचरा आहे. संपूर्ण महिन्याचे वेळापत्रक आखले जातात. पाणी मोजण्याचेही यंत्र आहे. पाच लीटर पाण्याचा नमुना तपासणीकरिता घेतला जातो. त्याचा अहवाल दोन महिन्यांनी येतो. कारखान्यातील दूषित पाणी, सांडपाणी यांचे नमूने घेतले जातात. तपासाअंती काही प्रदूषण आढळले तर केवळ कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहे. शहरात सर्वच प्रकारच्या प्रदूषणाने साम्राज्य निर्माण केले आहे. परंतु कागदपत्राचा प्रवास या कार्यालयातून त्या कार्यालयात होतो. मात्र, त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. या जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नावर कोणतेही कार्यालय गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.येत्या काही दिवसांत वायू मोजण्याचे यंत्र वाढविण्याचे विचाराधीन आहे. मुंबईतील कार्यालयातून यंत्राच्या संख्येची वाढ होते. शहरात सर्वाधिक प्रदूषण वाहनांचे आहे.- नागेश लोहळकर,प्रादेशिक अधिकारी, महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ
शहरात प्रदूषण मोजणारी तीन यंत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 10:17 PM
ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, घनकचरा प्रदूषण आणि जलप्रदूषण आदींपासून प्रदूषणाची वाढ होत आहे. शहरात सर्वाधिक प्रदूषण वायूमुळे होतो. वायुप्रदूषण मोजण्यासाठी शहरात केवळ तीन यंत्रे लावण्यात आली आहेत.
ठळक मुद्देजनतेचे आरोग्य धोक्यात : सहा वर्षांपूर्वी लागली यंत्रे, प्रदूषणात कमालीची वाढ