लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दर्यापूर पोलिसांच्या मारहाणीमुळे राजू बापूराव वानखडेंचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून निलंबित करा, अशी मागणी घेऊन बुधवारी भीम आर्मी व बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी घटनेचे गांभीर्य पाहता प्राथमिक चौकशीनंतर दर्यापूरचे ठाणेदार दीपक वानखडे तसेच जमादार सागर नाठे व मंगेश अघडते यांना तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात अटॅच केले.होमगार्ड राजू वानखडे यांना दर्यापूर पोलिसांनी कलम १४९ ची नोटीस देऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले व त्यांना अमानुष मारहाण केली. राजूला त्यांच्या आईने रुग्णालयात दाखल केले होते. पोलिसांच्या मारहाणीमुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला, त्यासाठी दर्यापूर पोलीस जबाबदार आहेत. त्यामुळे दोषी पोलिसांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यांचे निलंबन करा, अशी मागणी मृत राजूची आई इंदुबाई वानखडे यांनी केली. याविषयात बुधवारी भीम आर्मीचे जिल्हाप्रमुख सुदाम बोरकर, शहरप्रमुख बंटी रामटेके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले. बसपाचे प्रदेश महासचिव दादाराव उईके, नागपूर झोनचे दीपक पाटील, सुधाकर मोहोड, निळाताई भालेकर, अनंता लांजेवार, चंद्रमणी डोंगरे आदींनीही दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी रेटून धरली. पोलीस अधीक्षकांच्या कारवाईनंतर रोष कमी झाला. त्यानंतर राजूचे नातेवाईक व भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी शवविच्छेदनगृह गाठले. पोलीस अधीक्षक तेथे पोहोचल्यानंतर भीम आर्मीच्या पदाधिकाºयांनी राजूला न्याय मिळवून देण्यासाठी घोषणाबाजी केली.इन कॅमेरा पीएममृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी भीम आर्मीने केली होती. पोलीस अधीक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संवाद साधला. न्यायाधीशांच्या परवानगीने प्रक्रिया सुरू झाली होती.दर्यापुरात तणावराजू वानखडे मृत्यूप्रकरणाचे पडसाद दर्यापुरातही उमटले. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेकडोंचा जमाव ठाण्यापुढे होता.एसपी पोहोचले इर्विनच्या शवविच्छेदनगृहातघटनेचे गाभीर्य पाहता, पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांनी बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदनगृह गाठले. त्यांनी इर्विन येथील निवासी जिल्हा शल्यचिकित्सक सतीश हुुमने यांची भेट घेतली. त्यानंतर स्वत: शवगारात ठेवलेला राजू वानखडेच्या मृतदेहाची पाहणी केली. यावरून एसपींच्या कर्तव्यदक्षतेचा परिचय झाला.वानखडे कुटुंबीयांचा आधारवड गेलाराजू वानखडेचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांचा आधारवड गेला आहे. आई इंदुबाई, पत्नी शीला, यश व पूर्वी अशी दोन मुले उघड्यावर आली आहेत. बुधवारी राजूच्या कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पोलीस अधीक्षकांकडे न्यायासाठी आक्रोश केला.दर्यापूरचे ठाणेदारासह एका दोषी कर्मचाऱ्याला नियंत्रण कक्षात अटॅच करण्यात आले आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल.- डॉ. हरी बालाजी एन., पोलीस अधीक्षक.
ठाणेदारासह तीन कर्मचारी नियंत्रण कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 6:00 AM
पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी घटनेचे गांभीर्य पाहता प्राथमिक चौकशीनंतर दर्यापूरचे ठाणेदार दीपक वानखडे तसेच जमादार सागर नाठे व मंगेश अघडते यांना तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात अटॅच केले.
ठळक मुद्देहोमगार्ड राजू वानखडे मृत्यूप्रकरण : भीम आर्मी, बसपाची एसपी कार्यालयावर धडक