पवन बुंदेले हे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सहकाऱ्यांसमवेत ८ ऑगस्टला क्रिकेट खेळत होते. दुपारी चारच्या सुमारास पाच दुचाकीस्वारांनी आलेल्या पाईप्स, लाठी, काठी आणि चायना चाकूने पवन बुंदेले यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला होता. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले होते यात तीन सहकारीसुद्धा जखमी झाले होते. घटनेतील मुख्य आरोपी पवन शिशुपाल परीवाले यास घटनेच्या दिवशी रात्री पोलिसांनी अटक केली होती. बाकीचे सर्व आरोपी फरार होते.
आरोपीचा शोध घेण्याकरिता अचलपूर पोलिसांनी चार पथके चिखलदरा, बानूर, हत्ती घाट, घाटंग व परतवाडा येथे शोध घेत होते. शेवटी अचलपूर पोलिसांना राजू साबण कर, (२२, रा. पेन्शनपुरा परतवाडा), राज दीपक उईके (२५,रा. रविनगर परतवाडा) व धीरज श्यामलाल नांदवंशी (२४, रा. पेन्शनपुरा) या तिघांना अटक करण्यात यश आले.
सदर आरोपीविरुद्ध विविध ठाण्यात दंगा, खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न, चोरी,,घरफोडी, दरोडा, वाटमारी आदी गुन्हे दाखल आहेत. घटनेतील सर्व आरोपी परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने अचलपूर पोलिसांना परतवाडा पोलिसांची साथ मिळाली.
सदर कारवाईत अचलपूरचे ठाणेदार मनोज चौधरी तसेच परतवाडाचे ठाणेदार सदानंद मानकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रवींद्र बारड, पीएसआय राजेश भालेराव, पोलीस हवालदार पुरुषोत्तम बावनेर, शिपाई मुजफ्फर, मदन विके, कदम गणेश बेलोकर शुभम घोरपडे यांनी केली.
200821\img-20210820-wa0105.jpg
पवन बुंदेले हल्ला प्रकरणी तीन आरोपींना अटक