कटर मशीन जप्त
परतवाडा वनविभागाची कारवाई : वाहन जप्त
फोटो पी २३ सागवान
पान २ ची सेकंड लिड
परतवाडा : अमरावती प्रादेशिक वनविभागांतर्गत परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंजनगाव तालुक्यातील भंडारज येथे धाड टाकून जवळपास तीन लाखांचे अवैध सागवान पकडले. यात लाकूड कापण्याची मशीनही वनविभागाने ताब्यात घेतली. २२ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.
भंडारज येथील महेंद्र दिपटे याच्या घरातून हे लाकूड वनाधिकाऱ्यानी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनासह लाकूड आणि लाकूड कापण्याची मशीन परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आली. आरोपीच्या घरात कोरोनाच शिरकाव शिरल्यामुळे त्याला वनविभागाने ताब्यात घेतले नाही. जप्त लाकूड आणि फर्निचर हे अवैधरीत्या कापलेल्या वृक्षाचे असून, जप्त मालाचा वैध दस्तावेज आरोपीकडे आढळून आला नाही, असे या कारवाईच्या अनुषंगाने वनविभागाने स्पष्ट केले. उपवनसंरक्षकद्वय चंद्रशेखरन बाला व गिन्नी सिंह यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड, वनपाल एस.एस. इंगोले व गणेश सावळे, वनरक्षक प्रशांत उमक, नितीन अहिरराव, विजय तायडे, प्रवीण निर्मळ, राजेश धुमाळे, पी.डी. विटीवाले, शिवम बशले, राजेश गायकी, डी.ए. देशमुख, रूपाली येवले यांच्यासह परतवाडा आणि अंजनगाव वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई पूर्णत्वास नेली.