लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कार्पोरेट कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचाºयांप्रमाणेच आता जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते नववीतील एकूण ३ लाख ७९ हजार ३६४ विद्यार्थ्यांचा स्वमूल्यांकन अहवाल (केआरए) लवकरच तयार होणार आहे. विशेष म्हणजे हा ‘केआरए’ आॅनलाईन दिसणार असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन ठोस कार्यक्रम पुढील काळात राबविला जाणार आहे.शालेय विद्यार्थ्याने त्याच्या वयानुसार मुलभूतक्षमता प्राप्त केली आहे किंवा नाही, याची तपासणी विविध शैक्षणिक प्रगती चाचण्यांद्वारे केली जाणार आहे.पायाभूत चाचणी हा त्याचाच एक भाग आहे. शिक्षण विभागाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व माध्यम मिळून २ हजार ८५२ शाळांमध्ये ७ सप्टेंबरपासून याचा श्रीगणेशा झाला. पहिल्या दिवशी प्रथम भाषा मराठी, शुक्रवारी गणिताची चाचणी पार पडली त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी इंग्रजी तर मंगळवार १२ सप्टेंबर रोजी विज्ञान विषयाची चाचणी होणार आहे. जिल्ह्यातील मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये ही चाचणी बंधनकारक आहे. लेखी व तोंडी चाचणी घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण संकेतस्थळावर भरले जातील. त्यासाठी चार दिवसांची मुदत आहे. शाळास्तरावर आणि नंतर तालुका व अन्य पथकांच्या माध्यमातून मुलांची फेरतपासणी केली जाईल. शाळा, तालुका आणि जिल्हास्तरीय पथक स्वतंत्ररीत्या विद्यार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर भरणार आहेत. परिणामी एका विद्यार्थ्याची पायाभूत चाचणी, शैक्षणिक प्रगती, तोंडी चाचणीबाबतचे विद्यार्थी व शिक्षकांचेही अभिप्राय नोंदविले जाणार आहेत. जिल्ह्यात एकाचवेळी पायाभूत चाचणी घेण्यात येत आहे.लेखी परीक्षेसाठी वर्गानुसार गुण आहेत. मात्र तोंडी परीक्षेत सर्वांना १० गुण आहेत. जिल्हा शिक्षण विभागाने स्वतंत्र पथक तयार केले आहे. शाळांना भेटी देऊन त्यांनीही त्यांचा अहवाल १३ सप्टेंबरपर्यंत सादर करावा, असे शिक्षण विभागाचे आदेश आहेत. या अहवालात शाळेची इत्यंभूत माहिती द्यावी लागणार आहे.विद्यार्थ्यांचे गुणही ‘अॅप’वर कृती कार्यक्रम सोयीचा होणारशालेय विद्यार्थ्यांचे प्रश्ननिहाय गुणांच्या नोंदणीसाठी शासनाने स्वतंत्र ‘अॅप’ विकसित केले आहे. त्यावर आॅनलाईन किंवा आॅफलाईन पद्धतीने गुणांची नोंदणी शिक्षकांना करता येणार आहे. अशी नोंद केल्यानंतर निकाल लगेच विद्यार्थ्यांना कळेल. यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती कळणार असून त्यामुळे कृती कार्यक्रम सोपा होईल.तफावत आढळल्यास कारवाईशिक्षक, केंद्रप्रमुख जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पथकाच्या तपासणीत २० टक्क्यांपेक्षा अधिक तफावत आढळल्यास संबंधित शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे.
तीन लाख विद्यार्थ्यांचा होणार स्वमूल्यांकन अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:22 PM