(फोटो आहे)
अमरावती : नांदगावपेठ व राजापेठ हद्दीत पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने कारवाई करून अवैध दारूसह ३ लाख ५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री व सोमवारी सकाळी करण्यात आली.
नांदगावपेठ हद्दीतील हॉटेल साई संतोष (मराठा दरबार) हे रात्री उशिरा सुरू असल्याने सदर ठिकाणी पथकाने धाड टाकली असता, हॉटेलमध्ये विनापरवाना अवैध दारू मिळून आली. हॉटेलमालक शेखर ज्ञानेश्वर बिरे (५२, रा. शिवालिकनगर) याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील ३७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रविवारी रात्री ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या आदेशाने विशेष पथकाचे एपीआय पंकज चक्रे व पथकाने केली. राजापेठ हद्दीतील रुक्मिणीनगर परिसरात आरोपी रणधीर रमेश गुप्ता (४९, रा. नवी वस्ती, बडनेरा) याला तीन लाखांच्या चारचाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले.