शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

शस्त्रक्रियेनंतर तीन अजगरांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:12 AM

साप म्हणताच भल्याभल्यांच्या काळजाला धसका बसतो. मात्र, साप हा मनुष्याचा शत्रू नसून मित्र असल्याची प्रचिती देत येथील वसा संस्थेने एक नव्हे, तर चक्क तीन जखमी अजगरांना शस्त्रक्रियेनंतर जीवदान देण्याची किमया केली आहे.

ठळक मुद्दे‘वसा’चा पुढाकार :८७ हानीकारक परजीवी काढल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : साप म्हणताच भल्याभल्यांच्या काळजाला धसका बसतो. मात्र, साप हा मनुष्याचा शत्रू नसून मित्र असल्याची प्रचिती देत येथील वसा संस्थेने एक नव्हे, तर चक्क तीन जखमी अजगरांना शस्त्रक्रियेनंतर जीवदान देण्याची किमया केली आहे. एवढेच नव्हे, अजगरांच्या शरीरावरून ८७ हानीकारण परजिवीदेखील काढल्या आहेत.येथील सर्पमित्र मुकेश वाघमारे यांना रहाटगावातून अपघातग्रस्त अजगराचे पिलू आढळले होते.दुसºया घटनेत अंकुश खरड याने नांदगावपेठ नजिकच्या अंगोळा गावातून मानेजवळ दुखापत आणि शरीरावर हानीेकारक परजिवी असलेला अजगर, तर अन्य एका घटनेत सर्पमित्र ठाकूर व वानखडे यांनी दर्यापूर तालुक्यातील सामदा गावात शेतात हार्वेरस्टरने जखमी झालेल्या अजगराला वाचवून ‘वसा’कडे पाठविले होते. सापांना जीवदान देण्यासाठी कार्यरत वसा संघटनेच्या पुढाकाराने अजगरांवर पशू शल्यचिकित्सक अनिल कळमकर, शंकर मुत्युल्वार व शुभम सायंके यांनी शस्त्रक्रिया केली. सलग पाच दिवस सायपरमिथ्रीन नामक परजिवी नाशक औषधीचा वापर करुन अजगरांना जीवदान दिले आहे. शस्रक्रियेसाठी अभिषेक पुल्लजवार, ऋग्वेद तुडुंवार, शुभम झगडे, गणेश अकर्ते, भूषण सायंके, अक्षय चांबटकर आदींनी मोलाची भूमिका बजावली आहे. तीनही अजगरांवर शस्त्रक्रिया, अहवालाची माहिती ‘वसा’कडून उपवनसंरक्षक हेमंत मीणा, वडाळीचे आरएफओ हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांना दिली जात आहे.